वृत्तसंस्था
सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाचे ९ रोजी उद्घाटन होत आहे. शिवसेनेचे आमदार, खासदार, पालकमंत्री आहेत. मात्र, पायाभूत सुविधांचे काय ? असा सवाल
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी विचारला आहे.What about infrastructure of Chipi Airport
कणकवली येथील भाजपा जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.विमानतळाचे जोड रस्ते, पाणी, ३३ केव्ही वीज लाईन कुठे आहे? पायाभूत सुविधांचे काय?उद्या पर्यटक आल्यानंतर सेवा मिळाली नाहीत, तर पर्यटक दुसरा पर्याय शोधणार आहेत.
मोपा विमानतळ सुरु झाल्यास पुढे काय? विमानतळ श्रेय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचेच आहे.शिवसेनेने विमानतळाच्या उद्घाटनाचे श्रेय घ्यावे,पण पायाभूत सुविधांचे काय? याचं उत्तर पालकमंत्री व आमदार ,खासदारांनी द्यावे,असा आवाहन त्यांनी केले.
- चिपीचे विमानतळ पायाभूत सुविधांपासून दूरच
- उदघटनाचे श्रेय सरकारने घ्यावे; सुविधाही द्याव्यात
- पर्यटकांना मूलभूत सेवा नसल्यास हसे होईल
- मोपा विमानतळ सुरु झाल्यास पुढे काय?
- श्रेय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचेच आहे
- गोवा ते सिंधुदुर्ग टुरिस्ट बोट सुरु करावी
- जेटी बांधली तर चांगलं होईल