West Bengal Assembly Election results : देशात पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. त्यापैकी अवघ्या देशाचे लक्ष प. बंगालच्या निकालाकडे आहे. येथे तृणमूल विरुद्ध भाजप अशी कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या निवडणूक निकालांबद्दल भाष्य केले आहे. दै. सामनातील आपल्या रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी अनेक राजकीय भाकिते केली आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या, तर हा मोदी-शहांचा वैयक्तिक पराभव ठरेल, असेही त्यांनी नमूद केले आहे. West Bengal Assembly Election results If Mamata wins in West Bengal Delhi will be shaken, predicts Sanjay Raut
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशात पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. त्यापैकी अवघ्या देशाचे लक्ष प. बंगालच्या निकालाकडे आहे. येथे तृणमूल विरुद्ध भाजप अशी कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या निवडणूक निकालांबद्दल भाष्य केले आहे. दै. सामनातील आपल्या रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी अनेक राजकीय भाकिते केली आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या, तर हा मोदी-शहांचा वैयक्तिक पराभव ठरेल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
आपल्या सदरात संजय राऊत यांनी लिहिलंय की, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा व्यक्तिगत पराभव ठरेल. बंगालमध्ये बाजी मारल्यानंतर ममता बॅनर्जी विरोधकांची गोळाबेरीज करून दिल्लीत ठाण मांडून बसतील. तेव्हा काय परिस्थिती होईल, यावर देशाच्या राजकारणाची आगामी वाटचाल अवलंबून असेल, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
‘बंगालनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ’
संजय राऊत लिहितात की, पश्चिम बंगालच्या निकालानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ सुरू होईल, असे छातीठोकपणे सांगणारे लोक भेटतात तेव्हा आश्चर्य वाटते. पश्चिम बंगालच्या निकालांवर महाराष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे, असे जे सांगत असतात ते नक्की कोणत्या नंदनवनात वावरत आहेत? मात्र, अमित शाह पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर महाराष्ट्रात लक्ष घालतील, असे सांगितले जाते. एकतर पैशांचा किंवा बळाचा वापर करून आमदारांची फोडाफोडी केली जाईल. कोरोना स्थिती हाताळण्यात अपयश आले सांगून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली जाईल. देशात औषधे आणि ऑक्सिजनअभावी चिता पेटत असताना हे राजकीय खेळ कोणाला सुचतातच कसे, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे.
…तर दिल्लीलाही बसतील हादरे
संजय राऊत पुढे लिहितात की, 2 मे नंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग येईल, असे म्हणणाऱ्यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील घडामोडींचे हादरे दिल्लालाही बसू शकतात. तसे वातावरण आज देशात आहे. पश्चिम बंगाल हा त्याचा केंद्रबिंदू आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती हाताबाहेर गेली असली तरी देशातील सत्तावाद आणि राजकारण संपलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र अस्थिर होईल असे म्हणणाऱ्यांनी दिल्ली स्थिर राहील का, हे सुद्धा पाहावे.
West Bengal Assembly Election results If Mamata wins in West Bengal Delhi will be shaken, predicts Sanjay Raut
महत्त्वाच्या बातम्या
- Tamil nadu Assembly Election २०२१ Result Live Updates : तमिळनाडूमध्ये द्रमुकची विजयाकडे घोडदौड, पहिल्या दोन तासांत १२९ जागांवर आघाडी; अद्रमुक पिछाडीवर
- पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचे भगीरथ भालके चौथ्या फेरीअखेर आघाडीवर, पारडे सारखे वर – खाली
- Assam Election Result LIVE : 10 वाजेपर्यंतचा कल, आसामात भाजप 50 हून जास्त जागांवर पुढे, तर काँग्रेस मागे, पाहा अपडेट्स
- West Bengal Assembly Election 2021 Results Live : बंगालमधील या उमेदवारांकडे व मतदारसंघांकडे जरूर द्या लक्ष… तिथे आहेत लक्षवेधी लढती
- West bengal assembly elections 2021 results updates : ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये पिछाडीवर, सुवेंदू अधिकारी आघाडीवर