• Download App
    युती सरकार असताना सारे आलबेल होते? ; नाना पटोले यांचा प्रश्न Were all the albels when there was a coalition government?Question from Nana Patole

    युती सरकार असताना सारे आलबेल होते? ; नाना पटोले यांचा प्रश्न

     

    मुंबई : शिवसेना व भाजपाचे सरकार असतानाही सर्व काही आलबेल होते का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. भाजपाकडून आमदार नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत,असा आरोप करून ते म्हणाले, ”महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. सरकारला कोणताही धोका नाही. नाराजीच्या काही बातम्या येत आहेत. त्यात काही तथ्य नाही. आघाडी सरकारमध्ये असे प्रकार होत असतात. त्यात नवे काही नाही.”Were all the albels when there was a coalition government?Question from Nana Patole

    पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले, ”हे सरकार तीन पक्षांचे आहे, काही मुद्द्यांवर आमदारांनी किंवा नेत्यानी वरिष्ठ नेत्याची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यात काही गैर नाही. ”



    पटोले म्हणाले ”काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र आली. महाविकास आघाडी सरकार स्थापन केली. किमान समान कार्यक्रमाच्या (CMP)आधारे सरकार चालवण्याचे ठरले होते. कोरोना संकटामुळे त्याची अंमलबजावणी करण्यात अडथळा आला. परंतु आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी मी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून ती केली आहे.”

    Were all the albels when there was a coalition government?Question from Nana Patole

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना