वृत्तसंस्था
पुणे : राज्यात कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील आठ दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तवली आहे. सोमवारी विदर्भ, कोकणात धुवाधार, तर पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.Weather Alert Rain with windy weather in Marathwada, Vidarbha along with Konkan
5 जुलै रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील काही भागात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे व विजेच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस, तर 6 व 7 जुलैदरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
तसेच उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Weather Alert Rain with windy weather in Marathwada, Vidarbha along with Konkan
महत्वाच्या बातम्या
- मध्यावधी निवडणुका : शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट घडते; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर
- डेन्मार्कच्या मॉलमध्ये गोळीबार : हल्लेखोराच्या अंदाधुंद फायरिंगमध्ये 3 ठार; अनेक जखमी
- मध्यावधी निवडणुका : शरद पवारांच्या माईंडगेम पाठोपाठ उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान!!
- कालीला धूम्रपान करताना दाखविणारे पोस्टर; सिनेमा दिग्दर्शक लीना मणिमैकली विरुद्ध संताप आणि एफआयआर!!