• Download App
    संजय राऊत दिसेल तेथे करेक्ट कार्यक्रम करू, नीलेश राणे यांचा इशारा|We will do a correct program where Sanjay Raut is seen, Nilesh Rane's warning

    संजय राऊत दिसेल तेथे करेक्ट कार्यक्रम करू, नीलेश राणे यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    सिंधुदूर्ग : करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय? संजय राऊत हा बोगस माणूस आहे. आम्ही जिथे दिसेल तिथे संजय राऊतांचा कार्यक्रम करू, असा इशारा माजी खासदार नीलेश राणे यांनी दिला आहे..We will do a correct program where Sanjay Raut is seen, Nilesh Rane’s warning

    खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना आम्ही आणखी एखादा करेक्ट कार्यक्रम करू असे राऊत म्हणाले होते. त्यावर पलटवार करताना राणे म्हणाले, करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय?, संजय राऊत हा बोगस माणूस आहे. आम्ही जिथे दिसेल तिथे संजय राऊतांचा कार्यक्रम करू.



    शिवसेनेवरही टीकास्त्र सोडताना राणे म्हणाले, शिवसेनेला आम्ही भीक घालत नाही. जन आशीर्वाद यात्रा आम्ही पूर्ण करणारच, असे ते म्हणाले. शिवसेनेकडे आचार-विचार राहिले नाहीत. शिवसेना केवळ अडवाअडवीची कामे करत आहे.

    आम्ही त्यांना काडीचीही किंमत देत नाही. संजय राऊत यांनी एकदा आमच्या गर्दीत उभ रहावे आणि मग साहेबांचे विचार काय आहेत ते पहावे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लावण्यात आली. असे असले तरी ते मात्र काही करू शकले नाहीत. एक दिवस तरी त्यांना ठेवायचे होते, असे आव्हान त्यांनी दिले.

    We will do a correct program where Sanjay Raut is seen, Nilesh Rane’s warning

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    न्यायालयाच्या निर्णयानंतरही मनाेज जरांगेंचा अडेलतट्टूपणा कायम, आझाद मैदानातून उठणार नसल्याची भूमिका

    मराठा आंदोलनामुळे मुंबईत वाहतूक कोंडी; मुंबई पोलिसांनी जारी केली ट्रॅफिक ॲडव्हायझरी!!

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंच्या गणपतीचे दर्शन; ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीवर लगावला टोला