• Download App
    आम्हाला काही करण्याची गरज नाही, महाविकास आघाडी सरकार अंर्तविरोधानेच पडेल, राज ठाकरे यांच्या परप्रांतियांच्या भूमिकेत स्पष्टता येत नाही तोपर्यंत एकत्र येण्यास बंधने, देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट |We don't need to do anything, Mahavikas Aghadi government will fall into contradiction, Devendra Fadnavis made it clear

    आम्हाला काही करण्याची गरज नाही, महाविकास आघाडी सरकार अंर्तविरोधानेच पडेल, राज ठाकरे यांच्या परप्रांतियांच्या भूमिकेत स्पष्टता येत नाही तोपर्यंत एकत्र येण्यास बंधने, देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आम्हाला काही करण्याची गरज नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकार तीन पक्षांतील अंतर्विरोधानेच हे सरकार पडेल. ज्या दिवशी सरकार पडेल तेव्हा आम्ही निश्चितपणे पर्याय देऊ, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या परप्रांतियांबाबतच्या भूमिकेत स्पष्टता येत नाही तोपर्यंत आमच्या एकत्र येण्यावर बंधने असल्याचेही त्यांनी सांगितले.We don’t need to do anything, Mahavikas Aghadi government will fall into contradiction, Devendra Fadnavis made it clear

    एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले, हे सरकार अंतर्विरोधाने भरलेले आहे. त्यांच्यामधील अंतर्विरोध आता मोकळा होत असून देशाच्या इतिहासात अंतर्विरोध असलेल्या कोणत्याही सरकारने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही.



    आज सत्तेमुळे तीन पक्ष एकमेकांना चिकटलेले असले तरी सत्ता फार काळ एकत्र ठेवू शकत नाही. प्रत्येकाचे स्वार्थ आहेत आणि ते मारले गेले की प्रत्येकाला खुर्चीत बोचायला लागते. आज तीच परिस्थिती बघायला मिळत आहे. आम्ही सत्तेकडे नजर लावून बसलेलो नाही पण अंतर्विरोधाने सरकार पडल्यास आम्ही निश्चितपणे पर्याय देऊ. राजकारणात पर्याय नेहमीच असतात. तोपर्यंत आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू.

    भाजप मनसेसोबत युती करणार का याविषटी फडणवीस म्हणाले की, भाजपला व्यापक हिंदुत्वाची अपेक्षा आहे. भाषा, प्रांताच्या आधारे भेदभाव आम्हाला मान्य नाही. मराठी माणसाला महाराष्ट्रात प्राधान्य मिळालेच पाहिजे पण म्हणून इतरांवर अन्याय करावा हे आम्हाला मान्य नाही

    त्या बाबतच्या राज ठाकरे भूमिकेविषयी स्पष्टता येत नाही तोवर आमच्या एकत्र येण्यावर बंधने आहेत. मात्र, माझ्या आणि राज यांच्या वैयक्तिक संबंधांमध्ये कधीही दुरावा आलेला नाही. मनसेने हिंदुत्व स्वीकारले आहे आणि मला वाटते की तो आम्हाला जोडणारा धागा आहे.

    We don’t need to do anything, Mahavikas Aghadi government will fall into contradiction, Devendra Fadnavis made it clear

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ