हा चित्रपट कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 25 जून 1983 च्या क्रिकेट विश्वचषकात भारताच्या विजयावर आधारित आहे. जेव्हा भारतीय संघाने अंतिम फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव करून पहिला विश्वचषक जिंकला होता.We are fortunate to be able to relive the events of 1983 World Cup through the movie ’83’ – Virat Kohli
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारताने जिंकलेल्या पहिल्या क्रिकेट विश्वचषकावर आधारलेला ’83’ सिनेमा नुकताच थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 25 जून 1983 च्या क्रिकेट विश्वचषकात भारताच्या विजयावर आधारित आहे.
जेव्हा भारतीय संघाने अंतिम फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव करून पहिला विश्वचषक जिंकला होता.भारताच्या त्या ऐतिहासिक विजयानं जागतिक क्रिकेटमध्ये भारताची ओळख तर झालीच, पण त्या विजयानंतर भारतीय क्रिकेटचं नवे पर्व सुरू झालं.
सध्या सगळीकडेच ’83’ सिनेमा चर्चेत असून, सर्वच सेलिब्रिटींनी या सिनेमाचं कौतुक केलं दरम्यान ’83’ सिनेमा पाहिल्यानंतर विराट कोहलीनं ट्विट करत आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी तो अतिशय भावुक झाला होता. ‘भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित क्षण यापेक्षा चांगलाप्रकारे अनुभवता आला नसता. एका सिनेमाच्या माध्यमातून 1983 च्या विश्वचषक स्पर्धेतील घटना आपल्याला पुन्हा अनुभवता येतेय, हे आमचं भाग्य आहे.’ असं विराट म्हणाला.
We are fortunate to be able to relive the events of 1983 World Cup through the movie ’83’ – Virat Kohli
महत्त्वाच्या बातम्या
- बूस्टर डोस हा मोदीजींच्या त्रिसूत्री कोरोनविरोधी लढा नक्कीच बळकट करेल – चंद्रकांत पाटील
- ….म्हणून भाजप अशा छोट्या नेत्यांना संधी देत ; रोहित पवारांची पडळकरांवर टीका
- उत्तर प्रदेशात भाजप विजयी चौकार मारले; कासगंजधून भाजप विजय यात्रेला अमित शहा यांच्या उपस्थितीत सुरुवात
- माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह म्हणाले- जीन्स घालणाऱ्या मुलींना मोदी आवडत नाहीत, फक्त 40 ते 50 वयोगटातील महिलांच मोदींमुळे प्रभावित