• Download App
    Water storage महाराष्ट्रात धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक!!

    Water storage महाराष्ट्रात धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा असूनही संभाव्य टंचाईची शक्यता लक्षात घेता पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले. जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव यांनी राज्यातील धरणसाठा व पाणीपुरवठ्याबाबत सादरीकरण केले. सध्या 18 जिल्ह्यांतील 644 गावे व 2051 वाड्यांमध्ये 796 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मागील वर्षी याच कालावधीत 2564 टँकर सुरू होते. बीड जिल्ह्यात गेल्या वर्षी 263 टँकर होते, सध्या तेथे एकही टँकर नाही. छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात सर्वाधिक म्हणजेच 275 टँकर कार्यरत असून त्यातील 192 टँकर केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहेत. मुख्यमंत्री यांनी टंचाईग्रस्त गावांमध्ये पुरेशा व नियोजनबद्ध पाणीपुरवठ्यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत.

    24 एप्रिल 2025 रोजी राज्यातील एकूण पाणीसाठा
    🔹मोठी धरणे: 10,401 दलघमी
    🔹मध्यम धरणे: 2,572 दलघमी
    🔹लघु धरणे: 2,101 दलघमी



    मुख्य धरणांतील उपयुक्त साठा (24 एप्रिल 2025 रोजीचा साठा)

    🔹गोसीखुर्द – 5.67 दलघमी (गेल्या वर्षी – 09.47)
    🔹तोतलाडोह – 20.74 दलघमी (गेल्या वर्षी – 20.46)
    🔹ऊर्ध्व वर्धा – 09.64 दलघमी (गेल्या वर्षी – 09.97)
    🔹जायकवाडी ३३.५१ दलघमी (गेल्या वर्षी – ८.८७)
    🔹मांजरा – 02.03 दलघमी (गेल्या वर्षी – 0.28)
    🔹हतनूर – 04.51 दलघमी (गेल्या वर्षी – 04.51)
    🔹गंगापूर – 03.07 दलघमी (गेल्या वर्षी – 02.48)
    🔹कोयना – 34.14 दलघमी (गेल्या वर्षी – 35.98)
    🔹खडकवासला – 0.96 दलघमी (गेल्या वर्षी – 01.06)
    🔹भातसा – 14.65 दलघमी (गेल्या वर्षी – 12.91)
    🔹धामणी ‌- 0.07 दलघमी (गेल्या वर्षी – 0.07)

    Water storage in dams in Maharashtra is satisfactory compared to last year!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadanvis : मूल्याधारित शिक्षणासाठी शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनबरोबर शालेय शिक्षण विभागाचा सामंजस्य करार

    Pahalgam attack पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना 50 लाखांचे अर्थसहाय्य

    PM Modi पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह, अजित डोवाल यांच्यासह तिन्ही सैन्यदल प्रमुखांची अत्यंत महत्त्वाची बैठक!!