• Download App
    आंदोलनात दंगा करणे, अर्वाच्च शब्दात बोलनणे हे योग्य आहे का? जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर केली टीका | Water Resources Minister Jayant Patil criticized BJP

    आंदोलनात दंगा करणे, अर्वाच्च शब्दात बोलनणे हे योग्य आहे का? जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर केली टीका

    विशेष प्रतिनिधी

    मुबंई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने आता तीव्र रूप धारण केले आहे. राज्यातील सुमारे 2000 हून अधिक कर्मचारी निलंबित झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर भाजपमधील बऱ्याच मोठ्या नेत्यांनी या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. चंद्रकांतदादा पाटील, देवेंद्र फडणवीस तसेच भाजपाच्या इतर काही नेत्यांनी एस टी कर्मचार्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सहभाग घेतला आहे. भाजप नेते नितेश नितेश राणे यांनी देखील दुपारी आंदोलनस्थळी जाऊन कर्मचाऱ्यांची भेट घेतली आणि सरकारवर जोरदार टीका केली.

    Water Resources Minister Jayant Patil criticized BJP

    या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे. जयंत पाटील म्हणतात, एसटी महामंडळातील कर्मचारी हे आमचेच आहेत. आम्ही कोणताही दुजाभाव आजपर्यंत केलेला नाहीये. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची आमची पूर्ण इच्छा आहे. आणि म्हणूनच आम्ही इथे आहोत. आमची पूर्ण सहानुभूती एसटी कर्मचारयांसोबत आहे. भाजपमधील काही नेते आंदोलनामध्ये पुढे येऊन बसतात, दंगा करतात, अर्वाच्च्य बोलतात हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.


    एनसीबी चा वापर नागरिकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी आणि त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी – जयंत पाटील


    पुढे ते म्हणतात, आजपर्यंत सगळी सरकारी, निमसरकारी कर्मचार्यांची आंदोलने ही त्या त्या संघटना करायचे. कोणताही राजकीय पक्ष संघटनांमध्ये पुढे येऊन सहभाग घ्यायचा नाही. पण भाजपने मात्र या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या ना त्या कारणाने त्यांना सरकारविरोधात वातावरण निर्माण करायचे आहे. असे दिसते आहे. असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

    Water Resources Minister Jayant Patil criticized BJP

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!