Maratha Reservation : विनायक मेटे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्या विरोधात औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करा अशी मागणी मेटे यांनी केलीय. 5 मे रोजी मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं, मात्र आजतागायत सरकारने कोणत्याच हालचाली केल्या नाहीयेत. सरकार मराठा समाजाविरोधात द्वेषाने वागत असल्याची टीका देखील यावेळी मेटे यांनी केलीय. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्या विरोधात येत्या मंगळवारी औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. याबरोबरच मराठा समाजाच्या ज्या मुला-मुलींनी नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण केलीय. त्यांना ताबडतोब नियुक्तीचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी देखील मेटेंनी केलीय. अन्यथा न्यायालयात सामोरे जाण्यास तयार रहा असा इशारा यावेळी मेटेंनी दिलाय. WATCH Vinayak Mete warns State Government on Maratha Reservation
महत्त्वाच्या बातम्या
- Toolkit वर ट्विटरच्या भूमिकेवरून केंद्राने सुनावले, म्हटले- आमची चौकशी सुरू, एकतर्फी कारवाई करू नका!
- असे आहे काशीचे कोरोना कंट्रोल मॉडेल : पीएम मोदींनी केले कौतुक, त्वरित उपचार, लसींची कमी नासाडी यासारख्या उपायांनी संसर्ग झपाट्याने कमी
- बंगाल निवडणूक हिंसेमुळे एक लाख लोकांचे पलायन, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
- DRDO चा आणखी एक आविष्कार, कोरोनावरील औषधानंतर अँटीबॉडी टेस्ट किट DIPCOVAN ची निर्मिती, संरक्षणमंत्र्यांनी केले कौतुक
- गौतम अदानी बनले आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत, एका वर्षात 33 अब्ज डॉलर्सची संपत्तीत वाढ