Narayan Rane Arrest : केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा संगमेश्वरमध्ये आली होती. नारायण राणेंचा जामीन कोर्टाने फेटाळल्याने त्यांना अटक करण्यासाठी रत्नागिरी पोलीस संगमेश्वरमध्ये आले. राणे जेवत असतानाच पोलिसांनी तेथे प्रवेश केला आणि अटकेची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे भाजप नेते नितेश राणे आणि नीलेश राणे संतापले. या घटनेचा एक व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला आहे. Watch Video Prasad Laad on Narayan Rane Arrest Says they Want To Kill Him, Rane Health Also Not Well
विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा संगमेश्वरमध्ये आली होती. नारायण राणेंचा जामीन कोर्टाने फेटाळल्याने त्यांना अटक करण्यासाठी रत्नागिरी पोलीस संगमेश्वरमध्ये आले. राणे जेवत असतानाच पोलिसांनी तेथे प्रवेश केला आणि अटकेची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे भाजप नेते नितेश राणे आणि नीलेश राणे संतापले. या घटनेचा एक व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला आहे.
भाजप नेते प्रसाद लाड यांनी हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ 57 सेकंदांचा आहे. त्यात एका खोलीत नारायण राणे खुर्चीवर बसून जेवताना दिसत आहेत. खोलीत एक डॉक्टरही आहेत. सोबत नीलेश आणि नितेश राणेही आहेत. तसेच प्रसाद लाड आणि इतर काही कार्यकर्तेही दिसत आहेत. त्याच वेळी काही पोलीस आत शिरले आणि त्यांनी राणेंना अटक करण्यात येत असल्याचं सांगितलं. चार पोलीस आत शिरल्यानंतर त्यांना नीलेश राणे सामोरे गेले. आणि पोलिसांवर प्रश्नांचा भडिमार केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.
भाजप नेते प्रसाद लाड यांनी याप्रकरणी गंभीर आरोप केला आहे. तुम्ही साहेबांचा रस्त्यात खून करणार आहात, असे ते म्हणाले. दुसरीकडे, नितेश-नीलेश राणेंसह पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन सुरू झाले. अटक वॉरंट आणि नोंदी दाखवण्याची मागणी करण्यात आली. जोपर्यंत नोंदी दाखवणार नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही, साहेबांच्या जीविताला धोका आहे, साहेबांना तुम्ही रस्त्यात मारणार आहात, खून करणार आहात, असा आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे.
अटकेवेळी काय घडलं?
पोलीस राणेंना अटक करण्यासाठी आल्यानंतर ऑर्डर दाखवा. आधी मला ऑर्डर दाखवा. नंतरच साहेबांना अटक करा, असं नीलेश राणे पोलिसांना बोलताना दिसले. तुम्ही साहेबांना हात का लावणार. साहेबांना हात नाय लावायचा. कधीपासून तुमचं हे चाललं आहे. कधीपासून गप्प बसायचं? आधी वॉरंट ऑर्डर दाखवा मगच साहेबांना अटक करा, असं नीलेश राणे बोलताना दिसत आहेत. तेवढ्यात एकजण एक मिनिट साहेब जेवत आहेत, असं म्हणताना दिसत आहे.
नारायण राणेंची प्रकृती खालावली, डॉक्टर म्हणाले, रुग्णालयात दाखल करावे लागेल
या सर्व गोंधळादरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे. डॉक्टर म्हणाले, सॅच्युरेशन नॉर्मल आहे. बीपी वाढलेला आहे, वय पाहता बीपी वाढला आहे, ते डायबिटीजचे पेशंट आहेत, ईसीजी आणि अॅडमिशन आवश्यक आहे. बीपी वाढल्यामुळे राणेंना रुग्णालयात अॅडमिट करावं लागेल, त्यानंतर पुढील ट्रीटमेंट द्यावी लागेल, असंही डॉक्टरांनी सांगितलं.
Watch Video Prasad Laad on Narayan Rane Arrest Says they Want To Kill Him, Rane Health Also Not Well
महत्त्वाच्या बातम्या
- ओवेसी अफगाणिस्तानबाबत परराष्ट्र मंत्रालयाच्या ब्रीफिंगलाही उपस्थित राहतील, 26 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय बैठक होईल
- BIG BREAKING : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलीसांकडून अटक
- रत्नागिरी सत्र न्यायालयाने नारायण राणेंचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळला; राणेंची उच्च न्यायालयात धाव, पण…
- WATCH : भाजप कार्यालयावरील हल्ले खपवून घेणार नाही देवेंद्र फडणवीस यांची हल्लेखोरांवर कारवाईची मागणी
- प्रोजेक्ट्सह भेटा फक्त चर्चा नको,आता सरकारचे फक्त 935 दिवस शिल्लक ; डॉ.कराड