प्रतिनिधी
नाशिक : दिंडोरी येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील सर्व कोथिंबीर आणि मेथीच्या जुड्या बाजारात आलेल्या लोकांना मोफत वाटल्या. आपल्या मालाला बाजारात कमी भाव मिळाल्याने निराश होऊन शेतकऱ्याने हा निर्णय घेतला. आपल्या उत्पादनांना योग्य किंमत न मिळाल्याने शेतकरी नाराज झाल्याचे सांगण्यात येत आहे.WATCH: Vegetable prices fall, Nashik farmer distributes coriander and fenugreek for free
दिंडोरी येथील संतोष बरकले हे शेतकरी आपल्या शेतमालाची विक्री करण्यासाठी आले होते, मात्र लिलावादरम्यान भाव खूपच कमी होता. उत्पादने विकून त्यांना मिळालेली रक्कम त्यांनी या भाज्या पिकवण्यासाठी गुंतवलेल्या रकमेपेक्षा 20 पट कमी होती.
मेथी आणि कोथिंबिरीच्या 1000 जुड्यांची विक्री करण्यासाठी बरकले यांनी 35 किलोमीटरचा प्रवास केला होता. या भाज्या पिकवण्यासाठी त्यांना सुमारे 20,000 रुपये खर्च आला. तसेच वाहतुकीसाठी 5 हजार रुपये खर्च केले. तरीही लिलावादरम्यान प्रत्येक जुडी केवळ 1 रुपयाला विकली जात होती. त्यामुळे रागाच्या भरात संतोष यांनी बाजारात फिरणाऱ्या वाहनचालकांना आणि लोकांना संपूर्ण शेतमाल मोफत वाटण्यास सुरुवात केली.
बरकले म्हणाले, “माझ्या संपूर्ण उत्पादनासाठी मला 1,000 रुपये मिळत होते आणि मी या भाजीपाल्यासाठी एकूण 25,000 रुपये गुंतवले आहेत. या भाजीची लागवड करण्यासाठी 20,000 रुपये आणि वितरित करण्यासाठी 5,000 रुपये लागले.”
बरकले यांना त्यांच्या गुंतवणुकीतून आणि श्रमासाठी मिळणाऱ्या तुटपुंज्या परताव्यावर ते असमाधानी होते, म्हणून त्यांनी शेतमाल मोफत देण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले, “किमती इतक्या कमी आहेत की त्यापेक्षा मोफत वाटणे चांगले; किमान ज्यांना या ताज्या भाज्या मिळतील त्यांचा तरी आशीर्वाद मिळेल.”
राज्यात एकीकडे कांद्याचा प्रश्नही गाजत आहे. आता भाजीपाल्याचेही भाव पडल्याने शेतकरी संतप्त असल्याचे दिसून येत आहे.
WATCH: Vegetable prices fall, Nashik farmer distributes coriander and fenugreek for free
महत्वाच्या बातम्या
- UNHRC : काश्मीर, दहशतवाद आणि अल्पसंख्यांकावरील अत्याचारांवरून भारताने पाकिस्तानला फटाकरलं!
- सहा महिन्यांपूर्वी मिळाला शांततेचा नोबेल, आता 10 वर्षांचा तुरुंगवास, बेलारुसमध्ये एलेस यांना कोर्टाने ठरवले दोषी
- राहुल गांधींनी केंब्रिजमध्ये केले चीनचे कौतुक : म्हणाले- चीन हा शांतताप्रिय देश आहे, तिथले सरकार कॉर्पोरेशनसारखे काम करते
- केंब्रिजमध्ये भारताची निंदा करून राहुल गांधींची अफाट चीन स्तुती!!; हेमंत विश्वशर्मांची सणसणीत चपराकी उत्तरे