liquor ban in Chandrapur : चंद्रपुरातील दारूबंदी हटवण्याच्या निर्णयामागे सरकारचा कोणता तर्क आहे, यामागे सरकारने कोणते जनहित पाहिले समोर आले पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. चंद्रपुरातील दारूबंदी हटवण्याच्या निर्णयाचा सर्वस्तरांतून निषेध होऊ लागला आहे. यामुळे मुनगंटीवारांनी सरकारला जाब विचारला आहे. शेतकऱ्यांची वीजबिलं माफ करणार नाहीत, त्यांच्याकडून जबरदस्तीने वसुली होणार, पण परमिट रूम, बारवाल्यांची बिलं मात्र माफ करण्याची शिफारस केली जाते, अशी टीकाही त्यांनी केली. त्याचबरोबर पदोन्नतीतील आरक्षण देणार नाहीत, पण दारूबंदी हटवली जाते, ही काँग्रेसची अमूल्य भेट आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. Watch Sudhir Mungantiwar criticizes CM Thackeray on lifting the liquor ban in Chandrapur
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईकरांना दिलासा : सोमवारपासून सर्वसामान्यांसाठी पुन्हा धावणार बसेस, फेस मास्क घालणे अनिवार्य
- स्वागतार्ह : ऑनलाइन शिक्षणात खंड पडू नये म्हणून नवी मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, नेटपॅकसाठी 35 हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 1 हजार रुपये
- नागपुरात अभिनेता संजय दत्तने नितीन गडकरींची भेट घेतली, पदस्पर्श करून घेतला आशीर्वाद
- जम्मू कश्मीर : पुलवामातील त्रालच्या बस स्टँडवर CRPF पथकावर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, 7 जण जखमी, शोध मोहीम सुरू
- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अनलॉक मॉडेलचे उद्योगपतींकडून कौतुक, देशभर राबविण्याचे केले आवाहन