Spain Video Of Ganpati Bappa Meets Jesus : आज अवघ्या देशभरात गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळत आहे. याचबरोबर देश-विदेशात स्थायिक झालेले भारतीयही ठिकठिकाणी गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत करत आहेत. नुकतीच सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील एक दृश्य पाहून सगळेच स्तब्ध होतात. Watch Spain Video Of Ganpati Bappa Meets Jesus in Church
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज अवघ्या देशभरात गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळत आहे. याचबरोबर देश-विदेशात स्थायिक झालेले भारतीयही ठिकठिकाणी गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत करत आहेत. नुकतीच सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील एक दृश्य पाहून सगळेच स्तब्ध होतात.
हा व्हिडिओ बॉलिवूड चित्रपट निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांच्यासह अनेकांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना विवेकने माहिती दिली की, स्पेनमध्ये चर्च प्रशासनाने स्वतः हिंदू समुदायाला गणपती बाप्पाला चर्चमध्ये आणण्यास सांगितले आहे, जेणेकरून दोन्ही देव एकमेकांना भेटू शकतील. दरम्यान, हा व्हिडिओ 2017चा असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सोशल मीडियावर तो पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे.
चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी 8 सप्टेंबर रोजी ट्वीट केले आणि माहिती दिली की, स्पेनमधील लोक गणपतीच्या बाप्पाची मिरवणूक काढत होते, तेव्हा त्यांना वाटेत चर्च दिसले. त्यांनी चर्च प्रशासनाला चर्चच्या बाहेरून मिरवणूक काढू देण्याची परवानगी मागितली. यावर चर्च प्रशासनाने हिंदू समुदायातील लोकांना गणपती बाप्पालाही आत आणण्यास सांगितले, जेणेकरून दोन्ही देव एकमेकांना भेटू शकतील.
व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की गणपतीची मूर्ती चर्चमध्ये प्रवेश करताच चर्चमधील लोक एक गाणे गातात, ज्यामुळे वातावरण अप्रतिम होते. हा व्हिडिओ अधिकाधिक व्हायरल होत असल्याबद्दल विवेक अग्निहोत्री म्हणाले की, हा व्हिडिओ त्यांना एका मित्राने पाठवला होता.
विवेक रंजन अग्निहोत्री हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक आहेत. 2019 मध्ये ते केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या पॅनेलचे सदस्य झाले. त्यांच्या बहुतेक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर अपयश मिळालेले आहे. तथापि, त्यांच्या ‘द ताश्कंद फाइल्स’ या चित्रपटाचे मात्र खूप कौतुक झाले होते.
Watch Spain Video Of Ganpati Bappa Meets Jesus in Church
महत्त्वाच्या बातम्या
- ममता सरकारच्या छळ आणि धमक्यांमुळे पत्रकाराचा बंगाल सोडून दिल्लीत आश्रय, नुपूर शर्मा यांनी व्यक्त केल्या वेदना
- काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचा गंभीर आरोप, म्हणाले- यूपी निवडणुकीत केंद्र सरकार अफगाणिस्तान संकटाचा फायदा घेणार!
- मोठी बातमी : पंतप्रधान मोदींची शीख बांधवांसाठी खास भेट, देशव्यापी ‘गुरुद्वारा सर्किट’ विशेष रेल्वेची घोषणा
- गणेश चतुर्थीला राहुल गांधींचे जम्मूत “जय मातादी”; काश्मिरी बहु मिश्र संस्कृती नष्ट केल्याचा संघावर आरोप
- Pune Ganesh Utsav 2021 : पुण्यातील मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना, गणेश मंडळांचा यंदाही ऑनलाईन कार्यक्रमावर भर