• Download App
    WATCH : मराठ्यांना आरक्षण देवेंद्र फडवसीसच देऊ शकतात -सदाभाऊ खोत । Watch Sadabhau Khot Criticizes Maha Vikas Aghadi Govt Over Maratha Reservation Issue

    WATCH : मराठ्यांना आरक्षण देवेंद्र फडणवीसच देऊ शकतात -सदाभाऊ खोत

    Sadabhau Khot : माजी मंत्री व रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत हे आज संगमनेर दौऱ्यावर होते. साकुर गावात त्यांनी शेतकऱ्यांबरोबर शेतकरी मेळावा घेतला. दूध प्रश्न, मराठा व धनगर आरक्षणाविषयी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मराठा समाजाला आरक्षण देवेद्रफडवनीस हेचदेऊ शकतात असे प्रतिपादन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिलेये. महा विकास आघाडीने कोर्टात मराठा आरक्षणाबाबत ची बाजू ज्या पद्धतीने मांडावी लागत होती ती मांडली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय.धनगर समाज्याकडे देखील राज्य सरकारने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप खोत यांनी केलाये. दूध प्रश्‍नावरून देखील सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. संगमनेर तालुक्यातील साकुर येथे त्यांनी शेतकरी मेळावा घेतलेला आहे. या मेळाव्यात खोत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. संगमनेर तालुका रयत क्रांती संघटनेकडून सदाभाऊ खोत यांचा साकुर गावात सत्कारदेखील करण्यात आला. सदाभाऊ खोत यांनी संघटनेच्या साकूर येथे शेतकऱ्यांबरोबर बैठक घेतली. खोत यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना हात घातला व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथील राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले त्या वेळेस जी गर्दी जमवली त्याबद्दलदेखील त्यांनी ताशेरे ओढले. शेतकरी हा कधीही घरात बसू शकत नाही, शेतकरी हा मातीतून घाम गाळून आपली उपजीविका भागवतो. त्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणतंही पॅकेज दिले नसल्याचा घणाघाती आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे. Watch Sadabhau Khot Criticizes Maha Vikas Aghadi Govt Over Maratha Reservation Issue

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य