Rally in Beed Demanding Maratha Reservation : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाल्यानंतर मराठा तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. राज्य सरकारने वेळकाढूपणा केल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नाही, असा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला. या अनुषंगाने बीडमध्ये शनिवार, 5 जून रोजी मराठा क्रांती संघर्ष मोर्चाद्वारे विराट मोर्चा काढण्यात आला. तत्पूर्वी, विनायक मेटे यांनी गत महिन्यात राज्य सरकारला मराठा आरक्षणावरून अल्टिमेटम दिला होता, आंदोलनाचा इशाराही दिला होता. परंतु राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कडक लॉकडाऊन लागल्यानंतर त्यांनी अनलॉक झाल्यावर मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले होते. मेटे म्हणाले की, प्रशासनं प्रशासनाचं काम करतंय आम्ही आमचं काम करतोय. मोर्चादरम्यान सहभागी मोर्चेकऱ्यांसाठी आचारसंहिता काढण्यात आली होती. या आचारसंहितेनुसार, शासनाच्या कोविड नियमांचे पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले होते. मेटे म्हणाले की, बीडचा मोर्चा झाल्यानंतर महाराष्ट्रात सगळीकडे मोर्चे निघतील. पुढच्या आंदोलनाची दिशा मोर्चात जाहीर करण्यात येईल. सरकारला अल्टीमेटम द्यायची वेळ संपलीये, आम्ही काय निर्णय घ्यायचा ते ठरवू. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले. बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विराट मोर्चा काढण्यात आला. Watch Rally in Beed Demanding Maratha Reservation by Vinayak Mete Maratha Kranti Morcha
महत्त्वाच्या बातम्या
- कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या 5600 कोटींच्या मालमत्तेचा लिलाव करणार बँका, पीएमएलए कोर्टाने दिली मंजुरी
- चिंताजनक : जगात वुहानसारख्या 59 प्रयोगशाळा, विषाणू लीक होण्याच्या दुर्घटनांचा धोका वाढला
- ट्विटरचा यू-टर्न : सरसंघचालकांसह अनेक नेत्यांच्या खात्यावर ब्लू टिक पुन्हा बहाल, फॉलोअर्सही वाढले
- GST Collection : मे महिन्यात जीएसटी कलेक्शनमध्ये 65 टक्के वाढ, सरकारी तिजोरीत किती आले जाणून घ्या
- Edible Oil Price : महागड्या खाद्यतेलापासून लवकरच सर्वसामान्यांना दिलासा, आंतरराष्ट्रीय पातळीवरही घसरण