Police Officer Helps needy Corona Patient : लंग्स इन्फेक्शन शंभर टक्के, ऑक्सीजन लेव्हल 60 आली होती. कल्याण ते मुंबई भरपूर प्रयत्न करुन देखील बेड उपलब्ध होत नव्हता. अखेर रुग्णाच्या भावाने पोलिसांना एक फोन लावला. पोलिसांनी या व्यक्तिसाठी प्रयत्न करुन रातोरात बेड उपलब्ध करुन दिला. त्या रुग्णाचा जीव वाचला आहे. त्या बिकट रात्री मदत करणा:या आणि खाकीतली माणूसकी दाखविणा:या पोलिसांचा सत्कर करुन रुग्णाच्या भावाने पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरात राहणारे व्यासायिक दीपक पाटील आपल्या कोविड रुग्ण भाऊ कैलास पाटीलला घेऊन सगळ्य़ा रुग्णालयात फिरत होते. कल्याण ते मुंबई एकही रुग्णालयात बेड उपलब्ध होत नव्हता. कैलास पाटील यांना लंग्स इन्फेक्शन शंभर टक्के होते. मधूमेह, रक्तदाब, ह्रदय विकार हे आजारही होते. कैलास काय होणार या ही चिंता त्यांना त्यांना होती. त्याचा रात्री कल्याणचे एसीपी अनिल पोवार यांना आणि बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक यशवंत चव्हाण यांना फोन लावला. चव्हाण हे नाईट डय़ूटीवर होते. दीपक पाटील यांच्या शब्दातून त्यांची वेदना चव्हाण यांनी हेरली. त्यांनी लगेच दोन पोलिस अधिकारी पाटील यांच्या मदतीसाठी पाठविले. कसेबसे कैलास पाटील यांना आर्ट गॅलरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा कुठे दीपक यांच्या जीवात जीव आला. कैलास उपचार सुरु झाले. तब्बल एक महिन्याच्या उपचारानंतर आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी 7 मे ला कैलास बरे होऊ घरी आले. तब्बल दोन महिन्यांनी त्यांची प्रकृती स्थिरावली आहे. फक्त खाकीतल्या माणूसकीमुळे मी जिवंत आहे असे उद्घार त्यांनी काढले. त्यांचे भाऊ दीपक पाटील यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक यशवंत चव्हाण यांचा पोलिस ठाण्यात सत्कार केला आहे. तुमच्यामुळे भावाला जीवदान मिळाले असे कृतज्ञता व्यक्त केली. WATCH Police Officer Helps needy Corona Patient For Ventilator Bed In Kalyan
महत्त्वाच्या बातम्या
- लोकप्रियता ओसरताच संघ मोदींना अडवानींसारखा बाजूला सारेल; काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांचा दावा
- Maharashtra Unlocked : राज्य सरकारच्या निकषानुसार नागपूरचा समावेश पहिल्या स्तरात ; जिल्हाधिकाऱ्यांकडून नियमावली जाहीर ; वाचा सविस्तर
- पुणेकरांना लोकल सुरु होण्याची प्रतीक्षा; एसटी, पीएमपीला परवानगी मग लोकल का नाही ?
- हैद्राबाद, नागपूरकडेही बुलेट ट्रेन धावणार ; मुंबई – अहमदाबाद मार्गासाठी गुजरातमध्ये वेग
- १,००,१३० : एक लाख कोरोना बळींचा महाराष्ट्रावर कलंक… देशातील प्रत्येक तीन मृत्यूंमागे महाराष्ट्रात जवळपास एक बळी