NCP Minister Hasan Mushrif : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र ही सुद्धा भाजपची चाल आहे, अशी टीका ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केली. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रताप सरनाईकांच्या पत्रावरून महाविकास आघाडीमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी मी बोलत असल्याचं ते म्हणाले. सत्तेत राहूनही काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते फोडत आहेत, असा आरोप प्रताप सरनाईकांनी केला आहे. त्यावर हसन मुश्रीफ म्हणाले, “सरनाईकांनी असा आरोप केला असला तरी राज्यात कुठेही तशी परिस्थिती नाही. कोल्हापूर जिल्हापरिषद गोकुळमध्ये शिवसेनेला संधी दिली. काही ठिकाणी स्थानिक प्रश्नावरून कुरबुरी झाल्या असतील याचा अर्थ फोडाफोडी चालली आहे असा नाही. प्रताप सरनाईक यांचं हे कारण जुजबी असावं, असंही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, भाजपकडून सुडाचं राजकारण सुरू आहे. शिवसेनेचे वाघ अशा धमक्यांना घाबरणारे नाहीत. भाजपकडून ज्या धमक्या दिल्या जात आहेत, त्याला सेना घाबरणार नाही. एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत असा करार झालाय का असा प्रश्न हसन मुश्रीफ यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांचे कार्यकर्ते आम्ही फोडतोच, त्यासाठी आम्हाला फुल्ल परवानगी आहे. परंतु शिवसेनेला हात लावायचा नाही हे आमचं ठरलेलं आहे. WATCH NCP Minister Hasan Mushrif Criticizes BJP Over MLA Sarnaik Letter To CM Thackeray
महत्त्वाच्या बातम्या
- कर्जात बुडालेल्या अनिल अंबानींना अच्छे दिन!, ग्रुपच्या मार्केट कॅपमध्ये 3 महिन्यांत 1000% उसळी
- धर्मांतराचे रॅकेट : पाकमधून फंडिंग, पैशांचं आमिष, मुलं-महिलांवर नजर… धर्मांतरण रॅकेटप्रकरणी पोलिसांचे 10 खुलासे
- धर्मांतरणाचे रॅकेट : आधी हिंदूच होता धर्मांतरणाप्रकरणी अटकेतील मौलाना उमर गौतम, सांगायचा मुस्लिम बनण्याची ‘ही’ कहाणी
- यूपीए Vs राष्ट्रमंच : ‘शरद पवारांचा हा पहिलाच प्रयत्न नाही’, राष्ट्रमंचच्या 15 विरोधी पक्षांच्या बैठकीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
- ‘राष्ट्रमंच’ तयारी २०२४ ची : शरद पवार १५ दिवसांत दुसऱ्यांदा प्रशांत किशोर यांना भेटले, पवारांच्या निवासस्थानी उद्या १५ विरोधी पक्षांची बैठक