• Download App
    WATCH : देशातील सर्व नेत्यांच्या संपत्तीची चौकशी करून गरिबांना वाटून द्या - बच्चू कडू । WATCH Minister Bacchu Kadu Says Seize All Politicians Property And Distribute in Poor

    WATCH : देशातील सर्व नेत्यांच्या संपत्तीची चौकशी करून गरिबांना वाटून द्या – बच्चू कडू

    Minister Bacchu Kadu : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अवैध संपत्तीची माहिती ईडीला देणार आहे, कारण त्यांची संपत्ती विदेशात आहे, असा खळबळजनक आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता, यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीच नाही तर श्रीमंत, अधिकारी यांच्यासह देशातील सर्व नेत्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे. संपत्ती वाईट मार्गाने कमावली की कुठल्या मार्गाने हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि मला वाटतं या देशातल्या सगळ्या नेत्यांची तपासणी चौकशी केली पाहिजे. जसं शेतकऱ्यांवर सीलिंग लावलं, तसं संपत्तीवर सीलिंग लावले पाहिजे व ही संपत्ती गरिबांना वाटून दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. दुसरीकडे, कोरोनामुळे शाळा व महाविद्यालये गेल्या दीड वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे आता शाळा कशा सुरू होणार व केव्हा सुरू होणार ही प्रतीक्षा पालकांसह विद्यार्थ्यांना लागली. यावर शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. जे गाव कोरोनामुक्त आहे तेथे शाळा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, कोरोनामुक्त गाव जरी असलं तरी ते गाव कोरोनाग्रस्त होऊ शकते त्यामुळे त्याची भीती आहे. त्यामुळे माणूस महत्त्वाचा आहे, आरोग्य महत्त्वाचे आहे, कशा पद्धतीने शिक्षण सुरू करता येईल हा तर सर्वांचाच प्रश्न आहे. मात्र शाळा सुरू करताना मोठं धाडस करावं लागेल, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिलीय. WATCH Minister Bacchu Kadu Says Seize All Politicians Property And Distribute in Poor

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन

    AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार

    National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण