Maratha Reservation : कोल्हापूर : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयातून रद्द झाल्यानंतर अद्यापही त्याचे पडसाद उमटत आहेत. अशोक चव्हाण यांच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षण रद्द झालं, असा आरोप करत आज मराठा क्रांती ठोक मोर्चाने राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून अधिवेशन बोलवावे, तसेच निवड झालेल्या मुलांच्या निवडी रद्द करण्याच्या हालचाली थांबवाव्या, अन्यथा विद्यार्थ्यांना घेऊन मंत्रालयात घुसणार असल्याचा इशारा आबासाहेब पाटील यांनी दिला. राज्य सरकार आता मराठा आरक्षणावर पळवाटा काढायच काम सुरू आहे असल्याचे ते म्हणाले.
मराठा क्रांती ठोक मोर्चाने यानिमित्ताने काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. यानुसार आता आम्ही कोणावर विश्वास ठेवायच याचं स्पष्टीकरण सरकारने द्याव, राज्य सरकार मराठा आरक्षणाची भूमिका कधी घेणार हे सांगावं? ओबीसींप्रमाणे फी माफी कधी करणार, असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. सरकार आणि शासन यांच्यात अनागोंदी कारभार सुरू आहेत. निवड झालेल्या मुलांच्या निवडी रद्द करण्याचा हालचाली सुरु आहेत, असा प्रयत्न झाल्यास समाजाची मुलं मंत्रालयात घुसतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. WATCH Maratha Kranti Thok Morcha Press In Kolhapur Blames Ashok Chavan For Cancellation Of Maratha Reservation
महत्त्वाच्या बातम्या
- देशातील कोरोना स्थितीमुळे पंतप्रधान मोदींचा ब्रिटन दौरा रद्द, G7 देशांमध्ये होणार आहे बैठक
- उत्तराखंडमध्ये पुन्हा ढगफुटी, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली ITI ची इमारत, गृहमंत्री शहांनीही घेतला परिस्थितीचा आढावा
- अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची कोरोनावर मात, एम्समधून पुन्हा तिहार तुरुंगात रवानगी
- वादग्रस्त सचिन वाझे अखेर पोलीस सेवेतून बडतर्फ; अँटिलिया केस, मनसुख हिरेन मृत्यू खटल्यात आरोपी