Kharghar 120 Stranded People Rescue operation : राजधानी मुंबईत मुसळधार पावसाने कहर केला. इथल्या बर्याच भागांत 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. रस्त्यावर कार वाहताना दिसल्या. भूस्खलन आणि भिंती कोसळण्याच्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, नवी मुंबईतील खारघर पोलिसांनी रविवारी सायंकाळी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह नाले ओलांडून खारघर डोंगरावर गेलेल्या 78 महिला आणि 5 मुलांसह 120 लोकांची सुटका केली आहे. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. Watch Kharghar 120 Stranded People Rescue operation by Fire Team from Different Parts Of Navi Mumbai Due To Heavy Rainfall
वृत्तसंस्था
मुंबई : राजधानी मुंबईत मुसळधार पावसाने कहर केला. इथल्या बर्याच भागांत 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. रस्त्यावर कार वाहताना दिसल्या. भूस्खलन आणि भिंती कोसळण्याच्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, नवी मुंबईतील खारघर पोलिसांनी रविवारी सायंकाळी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह नाले ओलांडून खारघर डोंगरावर गेलेल्या 78 महिला आणि 5 मुलांसह 120 लोकांची सुटका केली आहे. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
व्हिडीओमध्ये दिसते की, खारघर टेकडीवर अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी अग्निशमन विभागाने बचाव अभियान सुरू केले. यादरम्यान 120 जणांची सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी 78 महिला आहेत.
अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, या सर्व 120 लोकांना खारघरच्या टेकड्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून वाचविण्यात आले आहे. अग्निशमन दलाने सांगितले की, त्यांना अग्निशमन केंद्रात मदतीसाठी लोकांचे कॉल आले होते. यानंतर त्यांना वाचवण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. व्हिडिओमध्ये हे दिसून येते की, अग्निशमन दलाच्या शिडीच्या साहाय्याने डोंगराळ रस्ता ओलांडून परिसरात अडकलेल्या लोकांना वाचवले जात आहे. तर शिडीच्या खाली पाणी भयंकर वेगाने वाहताना दिसत आहे.
Watch Kharghar 120 Stranded People Rescue operation by Fire Team from Different Parts Of Navi Mumbai Due To Heavy Rainfall
महत्त्वाच्या बातम्या
- कांवड यात्रेवर बंदी आणि बकरीदला सूट हा मुद्दा बनत चालला आहे, सर्वोच्च न्यायालयाने केरळ सरकारला मागितले उत्तर
- Monsoon Session : संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये विरोधकांचा जोरदार गोंधळ, लोकसभा आणि राज्यसभेची कार्यवाही स्थगित
- उत्तर भारतात पाकिस्तान बांगलादेशला जोडणारा ‘मुस्लिम बेल्ट’ तयार करण्याचा कट, काय आहे हे कुभांड वाचा सविस्तर…
- Pegasus Spyware : काय आहे पेगासिस स्पायवेअर, कसे हॅक केले जातात फोन? कुणी बनवले हे स्पायवेअर? वाचा सविस्तर…
- Monsoon Forecast : मुंबईसह कोकणात पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी