• Download App
    WATCH : कोल्हापुरात पोलीस आणि मराठा आंदोलकांत झटापट, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न । WATCH Fight Between Maratha Morcha Agitators And Police in Kolhapur

    WATCH : कोल्हापुरात पोलीस आणि मराठा आंदोलकांत झटापट, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न

    Maratha Morcha : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. 14 जून रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्नात असणाऱ्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना आज पोलिसांनी त्यांच्या कार्यालयातच कोंडून ठेवले. हा सगळा प्रकार सावित्रीबाई फुले परिसरातील जिजाऊ फाऊंडेशनच्या कार्यालयात घडला. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या दरवाजावर अक्षरश: हातांनी बडवून दरवाजा पोलिसांना उघडण्यास भाग पाडला. यावेळी कार्यालयातून बाहेर पडणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक आणि पोलिसांत यावेळेस जोरदार झटापट झाली. अखेर पोलिसांनी आंदोलकांना अटक केल्यानंतर आंदोलक रस्त्यावरती ठाण मांडून होते. तसेच राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मराठा समाजाच्या 2145 विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्तिपत्र देण्याची मागणी ही त्यांनी केली आहे. यावेळी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील कारवाईसाठी त्यांना जुना राजवाडा पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. WATCH Fight Between Maratha Morcha Agitators And Police in Kolhapur

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!