• Download App
    WATCH : भाजपतर्फे रिक्षावाल्यांना 1 हजार रुपयांचे सीएनजी पास, मोफत लसीकरण - चंद्रकांत पाटील । Watch BJP State President Chandrakant Patil Interacting With Media in Pune

    WATCH : भाजपतर्फे रिक्षावाल्यांना 1 हजार रुपयांचे सीएनजी पास, मोफत लसीकरण – चंद्रकांत पाटील

    BJP State President Chandrakant Patil : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. कोथरूडमधील रिक्षावाल्यांच्या मदतीसाठी भाजपतर्फे 1000 रुपयांचे सीएनजी पंपाचे पास रिक्षावाल्यांना वाटप करण्यात येणार आहेत. तसेच रिक्षावाले, भाजीविक्रेत्यांमधून 1200 जणांसाठी खासगी रुग्णालयातील लसीकरणाचा खर्चही भाजपतर्फे करण्यात येणार आहे. याशिवाय कोथरूड मतदारसंघातील हजारो मुलींना ड्रेसचे कापड देऊन त्यांच्या शिलाईचा खर्चही देण्यात येणार आहे. चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी जे जे पुढाकार घेतील अशा सर्वांसोबत अगदी पवारांसोबतही भाजप राहणार आहे, हे आम्ही यापूर्वीही स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारने गांभीर्याने घेतलं नाही, अखेर भोसले समितीच्या शिफारसीही त्याच निघाल्या, ज्या देवेंद्र फडणवीस सांगत होते. Watch BJP State President Chandrakant Patil Interacting With Media in Pune

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!