• Download App
    WATCH : महाविकास आघाडीतील नेते भांबावले, सर्वांचे स्वबळाचे नारे - प्रवीण दरेकर । Watch BJP Leader LoP Pravin Darekar Criticized Maha Vikas Aghadi Govt

    WATCH : महाविकास आघाडीतील नेते भांबावले, सर्वांचे स्वबळाचे नारे – प्रवीण दरेकर

    Pravin Darekar : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या नेत्यांच्या वक्तव्यांचा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी समाचार घेतला. दरेकर म्हणाले की, महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचा स्वबळाचा नारा आहे. सत्ता राहण्यासाठी, सत्ता टिकवण्यासाठी स्वबळाचे नारे देतही, एकत्रित राहण्याचा प्रयत्न राहील. भविष्यात महाविकास आघाडी सरकारचं काय होणार आहे, याचं मूर्तिमंत उदाहरण रोज त्या-त्या पक्षाच्या नेत्यांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळाचा नारा देत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत स्वबळाचा नारा देत असताना आव्हानात्मक भूमिका पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात घेतली असल्याचे समोर आले. आणि दुसऱ्या बाजूला सन्मानीय शरद पवार साहेब आम्ही एकत्रित लढणार असे सांगत आहे. त्यामुळे यांचा वक्तव्याचा फार गांभीर्याने जनता विचार करणार नाही, एकाबाजूला सत्तेत राहायचं आणि दुसऱ्या बाजूला स्वबळाचे नारे द्यायचे, त्यामुळे कशा पद्धतीने सत्ताधारी भांबावले आहे, मविआमध्ये किती विसंवाद आहे हे दिसून येते, असेही ते म्हणाले.  Watch BJP Leader LoP Pravin Darekar Criticized Maha Vikas Aghadi Govt

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : बंगाल SIR- अंतिम यादीत 7.04 कोटींहून अधिक मतदार; 61 लाख लोकांची नावे वगळली

    Ajit Pawar Plane Crash : AAIB चा प्राथमिक चौकशी अहवाल- अजित पवारांचे विमान कोसळण्यापूर्वी झाडाला धडकले:’ब्लॅक बॉक्स’ आणि ‘FDR’ खराब

    Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; 21 लोकांचा मृत्यू, 8 गंभीर जखमी; 5 किमीपर्यंत ऐकू आला स्फोटाचा आवाज