• Download App
    WATCH : भाजपच्या 12 निलंबित आमदारांची पत्रकार परिषद, सरकारच्या कटाची पोलखोल । WATCH BJP 12 Suspended MLA Press Conference Attack on Thackeray Govt

    WATCH : भाजपच्या 12 निलंबित आमदारांची पत्रकार परिषद, ठाकरे-पवार सरकारच्या कटाची केली पोलखोल

    राज्याचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान गदारोळ उडाला. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात राडा पाहायला मिळाला. सत्ताधारी तसेच भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की होऊन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आला. भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. या 12 आमदारांनी आता याप्रकरणी राज्यपालांची भेट घेऊन आपलं म्हणणं सविस्तर मांडलं आहे. तसेच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. एकही अपशब्द उच्चारलेला नसताना, कोणताही उपमर्द केलेला नसताना जाणूनबुजून कट रचून हे निलंबन करण्यात आल्याचं भाजप आमदारांनी म्हटलंय. WATCH BJP 12 Suspended MLA Press Conference Attack on Thackeray Govt

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला