• Download App
    WATCH : बँकेने पीक कर्ज नाकारल्याने बुलडाण्यातील शेतकऱ्यांनी किडनी काढली विकायला । Watch Bank Refuses To Give Crop Loan, Farmers demands Permission To Sell kidney in Buldana

    WATCH : बँकेने पीक कर्ज नाकारल्याने बुलडाण्यातील शेतकऱ्यांनी किडनी काढली विकायला

    Farmers demands Permission To Sell kidney in Buldana : पीक कर्जासाठी बँकांकडून छळ होत असल्याची तक्रार करत मलकापूर तालुक्यातील लोणवडी येथील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी किडनी विकण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे मागितलीय. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत त्‍यांनी हे निवेदन पाठवलेय त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय. खरीप हंगामाची पेरणी तोंडावर आलीय आणि गेल्या दोन-तीन वर्षापासून ची नापिकी आणि दीड वर्षापासून कोरोनामुळे सर्वकाही ठप्प झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वच अडचणीत आहेत, त्यामुळे यावर्षी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना बँकांकडून पिक कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नाही मात्र काही बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी उदासीनता दाखवत आहेत. त्याचा त्रास शेतकऱ्यांना होत आहे, त्यामुळे लोणवडी येथील दीपक पाटील, योगेश काजळे, दीपकसिंह गौर, सतीश काजळे, नितीन पाटील यांच्‍यासह अन्य शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलेय. ज्यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जिल्हा सहकारी बँक आणि लोणवाडी ग्रामसेवा सहकारी संस्‍थेकडून गेल्या वर्षी पीककर्ज घेतले होते. मात्र अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे ते भरता आले नाही. आता पेरणीचे दिवस जवळ आल्याने पीक कर्जाची आवश्यकता असताना बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे पीक कर्जाचे पुनर्गठण आणि पेरणीचा खर्च भागविण्यासाठी किडनी विक्रीची परवानगी देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. आणि गरजवंताला 50 हजार रुपयात किडनी विकण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केलीय. तसेच बँकेच्या उदासीनतेमुळे आणि अडवणुकीमुळे शेतकरी त्रस्त झाले असून असे निर्णय घेताना दिसून येत आहेत. Watch Bank Refuses To Give Crop Loan, Farmers demands Permission To Sell kidney in Buldana

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी

    Operation Sindoor : पाकिस्तानला आत घुसून मारणार, बचावाची एकही संधी नाही देणार; आदमपूर हवाई तळावरून मोदींची गर्जना!!

    Dr. Subbanna Ayyappan : पद्मश्री डॉ. सुब्बन्ना अय्यपन यांचा संशयास्पद मृत्यू; श्रीरंगपट्टणाजवळील कावेरी नदीत मृतदेह आढळला