वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज “राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे” नाव बदलून ते “मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार” असे केले. त्यावर राजकीय पक्षांमध्ये घमासान सुरू झाले असून काँग्रेसच्या नेत्यांनी जबरदस्त चिडचिड केली आहे, तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर वाद – चर्चा नको असे म्हणून हात झटकून ते मोकळे झाले आहेत. भाजपचे नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वकर्मा यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले आहे. was even hoping that they would rename it (Rajiv Gandhi Khel Ratna award) after Narendra Modi
राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नामांतर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केल्यावर अपेक्षेप्रमाणे काँग्रेस नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. राजीव गांधी यांनी देशाला एकविसाव्या शतकात नेले. त्यांचे योगदान देशाच्या प्रगतीत मोठे आहे. त्यांचे नाव काढून टाकून ते नाव देशाच्या इतिहासातून पुसले जाणार नाही, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ खासदार के. सुरेश यांनी केली.
आम्हाला वाटले आता मोदी हे राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून स्वतःच्या नावे खेलरत्न पुरस्कार देतात की काय?, कारण त्यांना “स्व श्रेष्ठत्वाचा” मानसिक विकार जडला आहे, अशी टीका दिग्विजय सिंग यांनी केली.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, मेजर ध्यानचंद यांचे योगदान मोठेच आहे. त्यांचे नाव खेलरत्न पुरस्कार याला दिले आहे. त्यावर आता वाद – चर्चा होऊ नये, असे मत व्यक्त केले. परंतु त्याच वेळी असे नामांतर करून सरकार काय करू इच्छित आहे?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी जवळीक ठेवून आहेत. परवाच त्यांनी राहुल गांधींच्या शेजारी बसून छोले-भटूरे चा आस्वाद घेतला होता. आजही ते राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरवर आंदोलनात सहभागी झाले होते. या पार्श्वभूमीवर राऊतांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचा नामांतर या मुद्द्यावर हात झटकणे याला काँग्रेसच्या दृष्टीने झटकाच मानला पाहिजे.
आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी आधीचे नाव पुरस्कारासाठी योग्य नव्हते असे सांगून काँग्रेसला डिवचले आहे. मेजर ध्यानचंद हे भारताचे सर्वात मोठे क्रिडापटू होते. त्यांच्या नावाने सुरुवातीलाच खेलरत्न पुरस्कार द्यायला हवा होता, असे मत विश्व शर्मा यांनी व्यक्त केले. विश्व शर्मा आज जरी भाजपचे मुख्यमंत्री असले तरी वर्षानुवर्षे ते आसाममध्ये काँग्रेसचे प्रमुख नेते होते. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे.