• Download App
    बंडातात्यांची नजरकैदेतून सुटका करा, आषाढी पायी वारीची परवानगी द्या, वारकरी संप्रदायाचे धुळ्यात आंदोलन । Warkari Protest in Dhule Over Banda tatya karadkar House arrest Issue demands permission of payi wari for Ashadhi

    बंडातात्यांची नजरकैदेतून सुटका करा, आषाढी पायी वारीची परवानगी द्या, वारकरी संप्रदायाचे धुळ्यात आंदोलन

    आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमावली तयार करून वारी करण्यास महाराष्ट्र शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. तसेच वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेले बंडातात्या कराडकर यांना पोलीस प्रशासनातर्फे नजरकैदेमध्ये ठेवण्यात आले असून त्यांना नजरकैदेतून मुक्त करावे व त्यांच्यासह संपूर्ण राज्यातील वारकऱ्यांना पायी वारीसाठी प्रशासनातर्फे परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या क्यूमाइन क्लब परिसरामध्ये वारकऱ्यांतर्फे आंदोलन करण्यात आले. Warkari Protest in Dhule Over Banda tatya karadkar House arrest Issue demands permission of payi wari for Ashadhi


    विशेष प्रतिनिधी

    धुळे : आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमावली तयार करून वारी करण्यास महाराष्ट्र शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. तसेच वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेले बंडातात्या कराडकर यांना पोलीस प्रशासनातर्फे नजरकैदेमध्ये ठेवण्यात आले असून त्यांना नजरकैदेतून मुक्त करावे व त्यांच्यासह संपूर्ण राज्यातील वारकऱ्यांना पायी वारीसाठी प्रशासनातर्फे परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या क्यूमाइन क्लब परिसरामध्ये वारकऱ्यांतर्फे आंदोलन करण्यात आले.

    एकीकडे संपूर्ण राज्यामध्ये राजकीय सोहळे अगदी व्यवस्थितपणे पार पडत असताना दुसरीकडे मात्र कोरोनाच्या नावाखाली वारकर्‍यांना अडवणूक करून कोरोनाची भीती दाखवली जात असल्याचा आरोप करत वारकऱ्यांनी धुळ्यात प्रशासनाच्या विरोधामध्ये टाळ मृदंग वाजवून निषेध केला आहे. यावेळी वारकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान टाळ व मृदंगाच्या गजराने परिसर दुमदुमून निघाला होता.

    पायी वारीसाठी आग्रही असलेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलेले आहे. याच मुद्द्यावरून भाजपनेही राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. हिंदू देवीदेवतांचा अपमान करणाऱ्या उस्मानीला मोकटा सोडले जाते, परंतु पंढरपूर पायी वारीचा आग्रह धरणाऱ्या वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान बंडातात्यांना मात्र पोलीस ताब्यात घेतात, यावरून भाजपने ठाकरे-पवार सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

    Warkari Protest in Dhule Over Banda tatya karadkar House arrest Issue demands permission of payi wari for Ashadhi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य