विशेष प्रतिनिधी
वर्धा : जिल्ह्यातील कन्या देशातील अनाथांची माय झाली. या माऊलीचे अचानक निधन झाल्याने सारा देश हळहळला. त्या माईची आढवण कायम राहावी म्हणून जिल्हा परिषदेच्या सभागृहाला सिंधूताई सपकाळ हे नाव देण्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांनी केली. त्याला सभागृहाने एकमताने मान्यताही दिली. Wardha Zilla Parishad Hall to be named as Sindhutai Sapkal
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सरिता विजय गाखरे यांच्या अध्यक्षेतत झालेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, सभापती माधव चंदनखेडे, विजय आगलावे, मृणाल माटे व सरस्वती मडावी यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.