• Download App
    मुलाचे वैदिक पद्धतीने शुभमंगल, खासदार रामदास तडस यांच्या कुटुंबातील वादावर अखेर पडला पडदा। Wardha Bjp Mp Ramdas Tadas Son Pankaj married With pooja in the Vedic manner, the curtain finally fell on the dispute in the family of Tadas

    मुलाचे वैदिक पद्धतीने शुभमंगल, खासदार रामदास तडस यांच्या कुटुंबातील वादावर अखेर पडला पडदा

    वृत्तसंस्था

    वर्धा : भाजपा खासदार रामदास तडस यांचा मुलगा पंकज तडस आणि पूजा यांचा वैदिक पद्धतीने विवाह झाल्यानंतर तडस कुटुंबातील वादावर पडदा पडला आहे. Wardha Bjp Mp Ramdas Tadas Son Pankaj married With pooja in the Vedic manner, the curtain finally fell on the dispute in the family of Tadas



    पंकज आणि पूजा यांचे रजिस्टर पद्धतीने लग्न झाले होते. यानंतर दोघेही खासदार तडस कुटुंबापासून दूर राहत होते. पूजाचा काल सकाळी आपला छळ आणि मारहाण होत असल्याचा व्हिडीओ चर्चेत आला होता. परंतु हे भांडण नवरा- बायकोचे आहे. मुलगा स्वतंत्र राहत आहे. मुलगा आणि सुनेने माझ्याकडे राहायला यावे, असे आवाहन त्यांनी केले होते. अखेर भांडण मिटले असून पंकज आणि पुजाचे वैदिक पद्धतीने लग्नही लागले आहे.

    दोघांचंही घरातच साध्या कार्यक्रमात वैदिक पद्धतीने लग्न पार पडलं. पंकज तडस आणि पूजाच्या या लग्नासोसबत वादावर पडदा पडल्याचं सांगण्यात आलं. दोघांचं याआधी रजिस्टर पद्धतीने लग्न झालं होतं. पूजाच्या व्हिडीओनंतर निर्माण झालेल्या वादानंतर घरातच पूजा आणि तडसचं लग्न लागलं. त्यामुळे सकाळी मारहाणीचा गंभीर आरोप आणि संध्याकाळी त्याच्याशीच लग्न असा ट्विस्ट या प्रकरणात पहायला मिळाला.

    Wardha Bjp Mp Ramdas Tadas Son Pankaj married With pooja in the Vedic manner, the curtain finally fell on the dispute in the family of Tadas

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!