विशेष प्रतिनिधी
मुबंई : मुंबई महानगरपालिकेच्या फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणुका होणार आहेत. या पाश्र्वभूमीवर राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग रचनेतील बदलामुळे राजकारण रंगले आहे.
Ward had been restructured as per convenience, BJP alleges
भाजप नगरसेवकांनी गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गांधी टोपी घालून महानगरपालिका आयुक्तांना गुलाबपुष्प देत गांधीगिरी आंदोलन केले आहे. आयुक्तांनी राजकीय दबावाखाली आणि पालिकेतील वरिष्ठ अधिकारी त्यांना डावलून संवैधानिक नियम धाब्यावर बसवले आणि लोकशाहीचे मूल्य पायदळी तुडवले. असे आरोप करत प्रभाग रचनेत फेरफार केला आहे असा आरोप केला आहे.
शिवसेनेने एका खासगी एजन्सीकडून आपल्याला अनुकूल अशी प्रभागरचना बनवून घेत रातोरात आयुक्तांकडून हे बदल करवून घेतले आहेत असा गंभीर आरोप नगरसेवकांनी केला आहे. या प्रभागांचा सीमारेषेमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय सोयीसाठी बेकायदेशीर फेरफार करण्यात आली आहे. या पुनर्रचनेमध्ये मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. तसेच पश्चिम उपनगरातील अनेक प्रभागांमध्ये मोठा फेरफार करण्यात आल्याचा दावाही भाजपने या वेळी केलेला आहे.
निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. म्हणून निवडणूक आयोगाने याबाबत पावले उचलून प्रभाग आराखड्याची पडताळणी निपक्षपातीपणे करावी. अशी मागणी भाजपने लेखी पत्राद्वारे केली आहे. अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येतील. असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.
सध्या सन 2011 च्या जनगणनेनुसार नगरपालिकांमध्ये किमान 16 तर जास्तीत जास्त 65 सदस्य संख्या आहे. तर महापालिकांध्ये किमान 65 तर जास्तीत जास्त 175 पर्यंत आहे. मुंबई महापालिके त ही संख्या 227 आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे देशात सन 2011 ची जणगणना अद्याप सुरु होऊ शकलेली नाही. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चदरम्यान 15 महापालिकांच्या तसेच सुमारे 100 हून अधिक नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.
Ward had been restructured as per convenience, BJP alleges
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान