विशेष प्रतिनिधी
मुंबई : वंशाचा “दिवा” मुलांपेक्षा मुली; भाजपच्या वळचणीला जाण्यावरून भावा – बहिणीत नव्याने जुंपली!!, असे म्हणायची वेळ आज अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे आली आहे. War of words between ajit pawar and supriya sule erupted over political heirship of NCP
रायगड जिल्ह्यातील कर्जत मध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात अजित पवारांनी हा विषय आज पुन्हा एकदा छेडला. काही लोकांना मुलांपेक्षा मुलीच “वंशाचा दिवा” वाटतात, अशा शब्दांत अजित दादांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना डिवचले. त्याचवेळी त्यांनी बारामतीतून आपलीच राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे अर्थातच अजित पवार गटाने सुप्रिया सुळे यांच्या बालेकिल्ल्यात बाण मारून ठेवला. अजित पवारांनी बारामतीत हा बाण मारून ठेवल्यामुळे सुप्रिया सुळे यांना बारामती ऐवजी सुरक्षित मतदारसंघ शोधण्याची वेळ आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. सुप्रिया सुळे बारामतीतून “एस्केप रूट” शोधत अर्थात पलायन करत वर्ध्यातून लढणार अशी उपचर्चा त्या चर्चेला चिकटली.
पण त्या पलीकडे जाऊन अजितदादांचे काहींना मुलांपेक्षा मुलीच “वंशाचा दिवा” वाटतात हे वक्तव्य सुप्रिया सुळेंना चांगलेच झोंबले. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
भाजप बरोबर जाण्याच्या मुद्द्यावर आपल्या देवगिरी बंगल्यावर चर्चा झाली होती, त्या चर्चेत सुप्रिया सुळे देखील सहभागी झाल्या होत्या, असा दावा अजित पवारांनी केला. मात्र हा दावा सुप्रिया सुळे यांनी खोडून काढला. मी गेट क्रश करून आत मध्ये गेले. माझ्या भावाचे घर आहे. मी केव्हाही जाऊ शकते. पण त्यांनी मला बोलावले नव्हते. त्या चर्चेत मी सहभागी झाले नव्हते. मी त्यांना विचारले, पण मला कोणीही काही सांगितले नाही. बेसिक चर्चा झाली होती. तुम्ही प्रस्ताव द्या, मी बाबांशी बोलते, असे मी त्यांना सांगितले होते. पण भाजपसोबत जाण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती, असा असा प्रतिदावा सुप्रिया सुळे यांनी केला.
वंशाचा दिवा मुलांपेक्षा मुलीच या वक्तव्यावरून देखील सुप्रिया सुळेंनी नेहमीप्रमाणे स्वतःवरचे संस्कार आणि सावित्रीबाई फुलेंचा वारसा सांगितला.
पण एकूण अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची वक्तव्य परस्परविरोधी ठरली. त्यामुळे भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाण्यावरून भावा बहिणीमध्ये पुन्हा एकदा भांडण जुंपल्याचे महाराष्ट्रासमोर उघड झाले.
राष्ट्रवादीतले मूळ भांडण
राष्ट्रवादीतल्या पक्षीय वारसाचे मूळ भांडण अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोन चुलत भावा बहिणीतच आहे. अजित पवारांनी महाराष्ट्रात राजकारण करून स्वतःचा पाया भक्कम केला, तर सुप्रिया सुळे आपण कायमच केंद्रीय राजकारणात राहणार असा दावा करत राज्याच्या राजकारणापासून दूर राहिल्या होत्या. किंवा अजित पवारांनी खेळी करून त्यांना दूर ठेवले होते. मात्र आता शरद पवारांच्या पूर्णपणे उतरत्या वयात राष्ट्रवादी काँग्रेसवर पूर्ण ताबा मिळवण्यावरून या दोन बहीण भावंडांमध्येच खरे भांडण जुंपले आहे आणि शरद पवार सध्या मुलीच्या बाजूला उभे राहात आपला पक्ष वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या पलीकडे या वादाला कोणताही अर्थ नाही.
War of words between ajit pawar and supriya sule erupted over political heirship of NCP
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारचे सर्वात मोठे यश; मणिपूरच्या सर्वात जुन्या बंडखोर गटाने शस्त्रे सोडली, केंद्राशी केला शांतता करार
- सारा तेंडुलकरची यशस्वी कामगिरी!
- मणिपूरमधील मैतेई उग्रवादी संघटनांवर अंकुश ठेवण्यासाठी गृह मंत्रालयाकडून न्यायाधिकरणाची स्थापना!
- प्रकाश आंबेडकर – रोहित पवारांची “अदृश्य शक्तीची” एकच भाषा; फडणवीसांवरच वेचक – वेधक निशाणा!!