• Download App
    वक्फ बोर्ड जमीन बळकावली, एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षांवर गुन्हा दखल ; बीड जिल्ह्यात खळबळ Waqf board grabs land, files case against former MIM district president in Beed district

    वक्फ बोर्ड जमीन बळकावली, एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षांवर गुन्हा दखल ; बीड जिल्ह्यात खळबळ

    विशेष प्रतिनिधी

    बीड – बीड जिल्ह्यात वक्फ बोर्डच्या मालमत्तेच्या गैरव्यवहारांची मालिका सुरूच आहे. एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्ष निजाम शेख यांनी बीड शहरातील एक एकर ८ गुंठे जमीन हडप केल्याचा आरोप झाला आहे. याप्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

    Waqf board grabs land, files case against former MIM district president in Beed district

    बीड शहराच्या मधोमध ही जमीन आहे. या जमिनीचे बनावट दस्तावेज तयार करून निजाम शेख यानी सदर जमीन हडप केल्याचा आरोप वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. याप्रकरणी बीड शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    वक्फ बोर्डच्या मालमत्ता गैरव्यवहाराची चार प्रकरणे आतापर्यंत समोर आली असून त्यात आणखी एकाची भर पडलीय.दरम्यान, ही जमीन वडिलोपार्जित असून मी कसलीही फसवणूक केली नाही.

    बीड नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने माझ्यावर जाणीवपूर्वक राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा प्रतिआरोप एमआयएम नेते निजाम शेख यांनी केला आहे.

    Waqf board grabs land, files case against former MIM district president in Beed district

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!