वाळूज येथील आगीच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
मृत कामगारांच्या नातेवाईकांना मदत जाहीर
विशेष प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत एका हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीस लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. WALUNJ 5 lakh each to the families of the 6 dead workers in the accident
मध्यरात्री लागलेल्या या आगीत सहा कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
याशिवाय जखमी कामगारांना तातडीने शासकीय खर्चाने सर्व वैद्यकीय उपचार द्यावेत अशाही सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. आग शमविण्यासाठी तसेच अडकलेल्यांना सुखरूप काढण्यासाठी करण्यात आलेल्या बचाव कार्याची माहितीही त्यांनी घेतली व हे मदत कार्य व्यवस्थित पार पडण्यास सांगितले.
WALUNJ 5 lakh each to the families of the 6 dead workers in the accident
महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तान निवडणूक आयोगाकडून इम्रान खान यांना मोठा धक्का, उमेदवारी रद्द
- विनेश फोगटने खेलरत्न-अर्जुन पुरस्कार परत केले; बजरंग पुनिया म्हणाला- महिला कुस्तीपटूंसाठी सर्वात वाईट काळ
- महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाकरेंचा पलड़ा पवारांवर भारी; पवारांच्या “राष्ट्रीय” राजकारणाची ही तर खरी “बारामती श्री”!!
- रशियाच्या बॉम्बहल्ल्यांनी युक्रेन हादरले, 122 क्षेपणास्त्रे, 36 ड्रोनने हल्ला; 24 जणांचा मृत्यू