विशेष प्रतिनिधी
पुणे : संतोष देशमुख प्रकरणातला मुख्य संशयित वाल्मीक कराड यांच्या सगळ्या आर्थिक नाडे आवळल्या गेल्यानंतर तो 21 दिवसांनी पुण्यामध्ये सीआयडी ऑफिसमध्ये शरण आला. शरण येण्यापूर्वी त्याने व्हिडिओ जारी करून आपण निर्दोष असल्याचा दावा केला. वाल्मीक कराड आज शरण येणार होता म्हणून त्याच्या समर्थकांनी सीआयडी कार्यालयासमोर गर्दी केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांनी वाल्मीक कराडला आश्रय दिला म्हणून तो 21 दिवस अटक होऊ शकला नाही असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला. वाल्मीक कराड याच्या विरोधात बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघाला होता. त्याच्या विरोधातला संताप वाढत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार सूचक मौन बाळगून बसले होते. धनंजय मुंडे हात वर करून मोकळे झाले होते.
संतोष देशमुख प्रकरणांमध्ये जे गुन्हेगार असतील त्यांना अटक करून फाशी द्या. पण माझे नाव राजकीय द्वेषापोटी या प्रकरणात गुंतवले आहे, असा दावा वाल्मीक कराड याने केला. वाल्मीक कराड शरण येण्यापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया अकाउंट वर त्याच्या शरणागती संदर्भात पोस्ट लिहून फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले होते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी गेल्या 21 दिवसांमध्ये वाल्मीक कराड आणि त्याच्या सगळ्या साथीदारांच्या आर्थिक नाड्या आवळल्या होत्या. त्या सगळ्यांच्या मालमत्ता जप्त करून बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यामुळे वाल्मीक कराडला शरण येण्याखेरीज दुसरा पर्याय उरला नव्हता. आर्थिक नाड्या आवळल्यामुळेच वाल्मीक कराड शरण यावे लागले. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे सुरेश धस यांनी सांगितले.
Walmik Karad Surrender Pune CID
महत्वाच्या बातम्या
- वाल्मीक कराडसह 4 फरार आरोपींची बँक खाती सील; शेवटचे लोकेशन उज्जैनमध्ये, नंतर गायब
- 2025 मध्ये वर्षभर अमित शाह काँग्रेसच्या टार्गेटवर; पक्षाचे नेते “नवा मोदी” बनवायच्या असाईनमेंट वर!!
- Manipur : मणिपूरमध्ये सलग 5व्या दिवशी गोळीबारात महिला व पत्रकार जखमी; CM म्हणाले- कुकी अतिरेक्यांचा शांतता-सौहार्दावर हल्ला
- Pandharpur : पंढरपूर जवळ भाविकांच्या खाजगी बसला भीषण अपघात