वृत्तसंस्था
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमधील एका वेटरने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. Waiter commits suicide in pune .With Facebook live
हॉटेलच्या इमारतीच्या १३ व्या मजल्यावरुन त्याने उडी मारल्याची घटना उघडकीस आली आहे. अरविंद सिंह राठौर ( वय२६ ),असे त्याचे नाव आहे.
अरविंद सिंह राठौर हा उत्तराखंडचा रहिवासी आहे. मुंढवा भागातील हॉटेल पेंट हाऊसमध्ये तो महिन्यापूर्वीच कामाला लागला होता. घटनेपूर्वी अरविंद याने फेसबूक लाईव्ह करत हॉटेलमधील काही लोकांनी त्याला फसवल्याचा आरोप केला व त्यामुळेच आत्महत्या करत असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेतली.अरविंद हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला रुग्णालयात दाखल केले.मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुंढवा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. ही घटना बुधवारी रात्री ८.३०वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
Waiter commits suicide in pune .With Facebook live
महत्त्वाच्या बातम्या