• Download App
    चार महापालिकांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचे 21 डिसेंबरला मतदान|Voting for the by-elections for the vacant posts in the four Municipal Corporations on December 21

    चार महापालिकांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचे 21 डिसेंबरला मतदान

    प्रतिनिधी

    मुंबई : धुळे, अहमदनगर, नांदेड – वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महापालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.Voting for the by-elections for the vacant posts in the four Municipal Corporations on December 21

    मदान यांनी सांगितले की, या पोटनिवडणुकांसाठी संबंधित प्रभागात आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. नामनिर्देशनपत्रे 29 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत स्वीकारले जातील. 5 डिसेंबर 2021 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. 7 डिसेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे.



    22 डिसेंबरला होणार मतमोजणी 

    नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 9 डिसेंबर 2021 पर्यंत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना 10 डिसेंबर 2021 रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 22 डिसेंबर 2021 रोजी करण्यात येणार आहे.

     महापालिकानिहाय रिक्तपदे अशी

    धुळे – 5 ब

    अहमदनगर – 9 क

    नांदेड वाघाळा – 13 अ

    सांगली मिरज कुपवाड – 16 अ

    Voting for the by-elections for the vacant posts in the four Municipal Corporations on December 21

    Related posts

    एसटी महामंडळात लवकरच 17742 पदांची कंत्राटी भरती; नव्या 8300 बस देखील लवकरच एसटी महामंडळाच्या ताफ्यात!!

    गोदातीरी अंतर्नादचा सुरेल जल्लोष; १७८५ विद्यार्थ्यांच्या भव्य सादरीकरणाने नाशिककर मंत्रमुग्ध!!

    Supriya Sule : बारामतीपासून नागपूरपर्यंत गॅसची अडचण; सरकारने सत्य कबूल करावे; सुप्रिया सुळेंचे आवाहन; म्हणाल्या- गॅस तुटवडा का नाकारता?