प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : नव्या लोकसभेत 33 % महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात मतदान करणाऱ्या एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी, इम्तियाज जलील यांच्या विरोधात भाजपच्या महिला चांगल्याच आक्रमक झाल्या. भाजप महिला मोर्चाने क्रांती चौकात निदर्शने करत ओवेसी आणि इम्तियाज यांच्याविरोधात संतप्त घोषणा दिल्या. या आंदोलनात दोन्ही खासदारांचे फोटो गाढवाच्या गळ्यात अडकविले होते. Voted against women’s reservation in Lok Sabha
लोकसभेत आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 % आरक्षण देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले होते. सत्ताधारी आणि विरोधक अशा सगळ्याच राजकीय पक्षांनी महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने मतदान केले. परंतु ओवेसी आणि इम्तियाज जलील यांनी महिला आरक्षणामध्ये मुस्लिम आणि ओबोसींसाठी स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी भूमिका घेत विधेयकांच्या विरोधात मतदान केले.
महिला आरक्षणाला विरोध केल्याचा आरोप करत भाजपच्या महिला मोर्चाने आज एमआयएमच्या या दोन्ही खासदारांच्या विरोधात निदर्शने करत आपल्या राग व्यक्त केला. महिलांनी खासदार इम्तियाज जलील (AMIM) यांच्या पुतळ्याला बांगड्याही भरल्या. भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, अमृता पालोदकर, माधुरी अदवंत यांच्या मार्गदर्शनाखील हे आंदोलन केले.
खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्या एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केले. त्यांच्या या भूमिकेला विरोध करण्यासाठी भाजपच्या महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. क्रांती चौकात शेकडो महिलांनी इम्तियाज जलील यांच्याविरोधात प्रचंड घोषणा देत त्यांच्या पुतळ्याला बांगड्या घातल्या. गाढवाच्या गळ्यात त्यांचा फोटो घालून त्यांच्या महिलाविरोधी वृत्तीचा निषेध केला.
Voted against women’s reservation in Lok Sabha
महत्वाच्या बातम्या
- नागपुरात 4 तासांत 4 इंच पाऊस; महिलेसह चौघांचा मृत्यू, 500 जणांना सुरक्षित स्थळी हलवले, लष्कराला पाचारण
- रशियाच्या ब्लॅक सी नौदल मुख्यालयावर हवाई हल्ला; युक्रेनचा दावा- 9 रशियन अधिकारी ठार; ब्रिटन-फ्रान्सच्या मिसाइलचा वापर
- उतावळ्यांनी बांधले गुडघ्याला बाशिंग; पवार काका – पुतण्या – आत्यामध्येच रंगले मुख्यमंत्रीपदाचे रेसिंग!!
- पवारांची पॉवरफुल खेळी; अदानींच्या लॅक्टोफेरिंग प्लांट एक्झिम पॉवरचे गुजरातेत उद्घाटन!!