प्रतिनिधी
मुंबई : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. Vitthal Rukmini insurance umbrella protection for lakhs of workers now Shinde-Fadnavis government decision
यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.
वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरि जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी हा या योजनेमागचा उद्देश आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करतांना सांगितले.
Vitthal Rukmini insurance umbrella protection for lakhs of workers now Shinde-Fadnavis government decision
महत्वाच्या बातम्या
- टाटांची एअरबस-बोईंगसोबत खरेदी करारावर स्वाक्षरी, एअर इंडियाला मिळणार 470 विमाने
- आंतरराष्ट्रीय योग दिवस : राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा विधान भवनात आंतरराष्ट्रीय योगाभ्यास!!
- अमेरिकेत मोदी : अमेरिकन कंपन्यांचे “मेक इन इंडिया” भारतीय संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती
- Adipurush : सिनेमाचा राजकीय प्रभाव; शरद पवार हे तर गद्दारीचे आदिपुरुष; खासदार अनिल बोंडेंचे शरसंधान