पुण्याच्या या विठ्ठल भक्तांनी 35 हजार रुपये खर्च करुन सुमारे 750 किलो फुले उपलब्ध करुन दिली आहेत.Vithuraya, a colorful shade in triangular decoration, decorated with 750 kg of flowers
विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : आज प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झेंडू, शेवंती आणि कामिनी अशा तिरंगी फुलांची आणि पानांनी सजावट करण्यात आली.विशेष म्हणजे तिरंगी सजावटीमध्ये सावळ्या विठुरायाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.मंदिर समितीच्या वेबसाईटवरुन देखील विठूरायाच्या मंदिरातील तिरंगी सजावट भाविकांना पाहता येत आहे.
दरम्यान आजच्या सजावटीसाठी पुण्याच्या सचिन आण्णा चव्हाण, संदिप वि.पोकळे, विक्रम भुरुक, राहुल ब.पोकळे, संतोष ल.पोकळे आणि भोलेश्वर पोकळे या विठ्ठल भक्तांनी 35 हजार रुपये खर्च करुन सुमारे 750 किलो फुले उपलब्ध करुन दिली आहेत.
अशी माहिती प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. शिंदे ब्रदर्स साई डेकोरेटर्स पंढरपूर यांनी आरास डेकोरेशनचे काम केले आहे. भाविकांची दर्शनासाठी मंदिरात गर्दी होत आहे.
Vithuraya, a colorful shade in triangular decoration, decorated with 750 kg of flowers
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सिंगल साइन ऑन’ सर्विस योजना ऑगस्टपासून; सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठे उपयुक्त
- हिरो कंपनीची बाईक पुन्हा बुक करण्याची संधी; १० हजार टोकन रक्कम देऊन नोंदणीची सुविधा
- PHOTOS मधून पाहा प्रजासत्ताक दिन : आयटीबीपीच्या जवानांचे उणे ४० डिग्री सेल्सिअस तापमानात ध्वजारोहण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जेपी नड्डांकडूनही ध्वजारोहण
- प्रजासत्ताक दिनानिमित्त गो फर्स्टची ऑफर; फक्त ९२६ रुपयात विमानप्रवास करण्याची संधी