• Download App
    पवारांसह बड्या नेत्यांचे निकटवर्ती, विश्वजीत कदमांचे सासरे अविनाश भोसलेंना सीबीआयच्या बेड्या!! Vishwajeet Kadam's father-in-law Avinash Bhosale was arrested by the CBI

    डीएचएफएल घोटाळा : पवारांसह बड्या नेत्यांचे निकटवर्ती, विश्वजीत कदमांचे सासरे अविनाश भोसलेंना सीबीआयच्या बेड्या!!

    वृत्तसंस्था

    पुणे : आजचा दिवस महाविकास आघाडी साठी जोरदार तडाखा देणारा ठरला आहे. सकाळी 6.30 वाजता शिवसेनेचे मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती अनिल परब यांच्या घरांवर सक्तवसुली संचनालय अर्थात ईडीने छापे घातले, तर सायंकाळी शरद पवारांसह अनेक बड्या नेत्यांचे निकटवर्ती व्यावसायिक अविनाश भोसले यांना केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने अटक केली.
    Vishwajeet Kadam’s father-in-law Avinash Bhosale was arrested by the CBI

    येस बँक आणि डीएचएफएल घोटाळा प्रकरणात अविनाश भोसले यांचा हात असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सीबीआयने या प्रकरणाचा पूर्ण तपास करून अविनाश भोसले यांना आज सायंकाळी बेड्या घातल्या आहेत. अविनाश भोसले यांच्या घरांवर आणि विविध व्यावसायिक ठिकाणांवर ३० एप्रिल रोजी सीबीआयने काही ठिकाणी छापे घातले होते.

    अविनाश भोसले यांची यापूर्वी ईडी आणि सीबीआयने चौकशीही केली होती. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीएचएफल प्रकरणात अविनाश भोसले यांना अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीबीआय अविनाश भोसले यांचा शोध सुरु होता. ईडीने यापूर्वी फेमा कायद्यांअंतर्गत अविनाश भोसले यांची चौकशी केली होती. अविनाश भोसले यांना अटक केल्यानंतर सीबीआय पुढील कारवाई नेमकी कोणावर करणार हे लवकरच समोर येणे अपेक्षित आहे समोर येईल. डीएचएफएल येस बँक वाधवान प्रकरणात सीबीआय अविनाश भोसले यांच्या शोधात होती.

    – विश्वजीत कदम यांचे सासरे

    सर्वसामान्य रिक्षाचालक म्हणून व्यवसाय सुरुवात करणारे अविनाश भोसले यांची बांधकाम व्यावसायिक म्हणून पुण्यासह राज्यातील विविध भागांत ओळख आहे. तसेच व्यवसायासोबतच शरद पवार यांच्यासह अनेक पक्षांच्या राजकीय नेत्यांसोबतच्या संबंधांमुळेही अविनाश भोसले चर्चेत असतात. अनेक बडे राजकीय नेते त्यांचे हेलिकॉप्टर वापरून राजकीय दौरे करत असतात. काँग्रेस नेते राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे ते सासरे आहेत. गेल्या काही काळापासून ईडीने त्यांच्याविरोधात कारवाईचा धडाका सुरू केल्याने ते अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणी आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Vishwajeet Kadam’s father-in-law Avinash Bhosale was arrested by the CBI

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!