विशेष प्रतिनिधी
मुंबई – भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय सध्या कोरोनामुळे बंद आहे; तरीही प्राणीसंग्रहालयातील प्राण्याबरोबर दुर्मिळ वृक्षांना पर्यटक आणि बच्चे कंपनीला भेटता येणार आहे. Virtual tour of ranicha baug will for people
व्हर्च्युअल टूरद्वारे राणीच्या बागेचा १६० वर्षाच्या इतिहासासोबतच प्राणी, पक्षी, वनस्पती पाहता येणार आहेत. राणीच्या बागेत २८३ प्रजातींचे ६,६११ वनस्पती २९१ दुर्मिळ, तर १५ औषधी झाडे आहेत. जगातील सातपैकी सहा खंडांतील देशी-विदेशी झाडे असलेले हे देशातील एकमेव उद्यान आहे. तसेय येथे १३ जातींचे ८४ सस्तन प्राणी व १९ जातींचे १५७ पक्षी आहेत.
राणीची बाग ही केवळ मुंबईकरांसाठीच नव्हे तर बाहेरगावावरून आलेल्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या बागेत कृष्ण वड, गोरख चिंच अशी अनेक दुर्मिळ झाडे पाहायला मिळतात. कोरोना काळात दीड वर्षांपासून काही आठवडे वगळता राणीची बाग पर्यटकांसाठी बंद आहे. ती अद्याप खुली झालेली नाही; मात्र राणीच्या बागेतील प्राण्याच्या विविध तऱ्हा, त्यांचे खेळ पर्यटकांना ‘द मुंबई झू’ या यूट्यूब चॅनलवरून पाहता येणार आहे.
त्याचबरोबरच बागेतील वृक्षसंपदेसोबतच राणीच्या बागेचा १६० वर्षांचा इतिहासही पहिल्यांदाच उलगडणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
Virtual tour of ranicha baug will for people
महत्त्वाच्या बातम्या
- नितेश राणे यांनी केली संपूर्ण रेल्वेच बुक, कोकणातील चाकरमान्यांसाठी गणेशोत्सवात मोदी एक्सप्रेस
- लष्करात महिलांचे पाऊल पडते पुढे, पाच महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदावर बढती
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना प्रौढांइतकाच धोका असेल, तज्ञांनी प्रतिबंधासाठी या सूचना दिल्या
- मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीत, उपमुख्यमंत्री केवळ पुण्याचेच असल्यासारखे वागतात, चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप