• Download App
    Virat kohali Vs BCCI : विराट कोहलीच्या वक्तव्यामुळे BCCIचं नुकसान ! सौरव गांगुलीच अध्यक्षपद जाणार?। Virat Kohli Vs BCCI: BCCI's loss due to Virat Kohli's statement! Will Sourav Ganguly be the next president?

    Virat kohali Vs BCCI : विराट कोहलीच्या वक्तव्यामुळे BCCIचं नुकसान ! सौरव गांगुलीच अध्यक्षपद जाणार?

    बीसीसीआय आणि कसोटी कर्णधार विराट कोहली यांच्यातील मतभेद  Virat Kohli Vs BCCI: BCCI’s loss due to Virat Kohli’s statement! Will Sourav Ganguly be the next president?


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि कसोटी कर्णधार विराट कोहली यांच्यातील मतभेद बुधवारी सर्वांसमोर आले. भारतातील सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या विराट कोहलीने सांगितलं की, त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी संघ (भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका) जाहीर होण्याच्या दीड तास आधी सांगितला.

    यावेळी कर्णधार विराट कोहलीने बोर्ड अध्यक्ष सौरव गांगुलीचे विधान जाहीरपणे नाकारलं.

    सौरव गांगुली आणि तत्कालीन प्रशिक्षक ग्रेग चॅपल वाद

    झिम्बाब्वेमध्ये कसोटी मालिका जिंकल्यानंतर गांगुलीला 2005 मध्ये कर्णधारपदावरून वगळण्यात आलं होते. त्याला कर्णधारपद सोडण्यास सांगण्यात आल्याचं त्यानं म्हटलं होतं. त्यावेळी दिवंगत जगमोहन दालमिया यांना मंडळाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं होतं.



    कोहलीच्या वक्तव्यामुळे बोर्डाचं मोठं नुकसान

    बोर्डाच्या एका प्रशासकाने सांगितलं की, “बीसीसीआयसाठी हे खूप कठीण आहे. जर बोर्डाने विधान जारी केलं तर कर्णधार खोटे सिद्ध होईल आणि निवेदन दिले नाही तर अध्यक्षांवर प्रश्न निर्माण होतील. कोहलीच्या वक्तव्यामुळे बोर्डाचे बरंच नुकसान झालं आहे.

    बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, एका वरिष्ठाने दावा केला की, कोहलीला टी-20 कर्णधार सोडणं योग्य आहे का, असं विचारलं असता त्यात नऊ जणांचा समावेश होता. यामध्ये अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे.

    विराटने गांगुलीचं वक्तव्य फेटाळलं

    गांगुलीच्या वक्तव्यावर अगदी उलट माहिती देताना भारतीय कर्णधार म्हणाला, “मी टी-20 कर्णधारपद का सोडू इच्छितो याची कारणे दिली आणि माझा दृष्टिकोन चांगला समजला. काहीही चुकीचे नव्हतं, कोणताही संकोच नव्हता आणि एकदाही असं म्हटले गेलं नाही की तू T20 चे कर्णधारपद सोडू नकोस.”

    Virat Kohli Vs BCCI: BCCI’s loss due to Virat Kohli’s statement! Will Sourav Ganguly be the next president?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस