विशेष प्रतिनिधी
मुंबई : पुण्यातल्या ऐतिहासिक शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केले. त्या नमाज पठणाचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला. त्यानंतर पुण्यातल्या हिंदुत्ववादी संघटनांनी शनिवार वाड्यासमोर मोठे आंदोलन केले. काही कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडून नमाज पठणाची जागा शुद्ध केली. परंतु, या सगळ्या प्रकारात पुण्यातले स्थानिक राजकारण उसळून वर आले. भाजप बरोबर सत्तेच्या वळचणीला आलेल्या रवींद्र धंगेकर आणि रूपाली ठोंबरे यांनी सुद्धा खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर ताशेरे ओढले. पण पुण्यातले कुठले हिंदुत्ववादी लोकप्रतिनिधी मेधा कुलकर्णींच्या बाजूने बोललेले दिसले नाहीत.
पण राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी मात्र ठाम भूमिका घेत शनिवार वाड्यातील नमाज पठणाला विरोध केला. शनिवार वाडा ही मराठ्यांच्या पराक्रमाची भूमी आहे. तिथे नमाज पठण करण्याचे कारणच काय?? असा संतप्त सवाल करून नितेश राणे यांनी तुम्हाला नमाज पठण करायचे, तर मशिदीत जाऊन करा तुमच्या प्रार्थना स्थळ जाऊन तुमच्या प्रार्थना करा, असे वक्तव्य केले.
यापुढे जाऊन त्यांनी जे शनिवार वाड्यातल्या नमाज पठनाचे समर्थन करतात त्यांना हाजी अलीवर महारती केली तर चालेल का तिथे हिंदुत्ववादी संघटनांनी जाऊन मोठ्याने हनुमान चालीसा पठण केले तर चालेल का? मग त्यांच्या भावना दुखावणार नाहीत का??, शनिवार वाड्यातले नमाज पठण समर्थन करायचे असेल, तर त्यांनी हाजी अलीवर कोणी महाआरती केली किंवा हनुमान चालीसा पठण केले, तर त्याच्या विरोधात आवाज काढता कामा नये, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला.
शनिवार वाड्यातले नमाज पठण आणि त्यानंतर हिंदुत्ववाद्यांनी केलेले आंदोलन या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी अज्ञात महिलांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. शनिवार वाड्यावर पोलिस बंदोबस्त देखील वाढविला.
viral video purportedly showing women offering namaz at Shaniwarwada
महत्वाच्या बातम्या
- Rajnath Singh : राजनाथ म्हणाले- ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक ट्रेलर होता; लखनौहून ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची पहिली खेप रवाना
- Delhi High Court : दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी- सक्षम जोडीदाराला पोटगी देता येत नाही, ते न्यायाचे साधन, लोकांना श्रीमंत बनवण्याचे नाही
- धाराशिव मधल्या अतिवृष्टीग्रस्तांना मदत देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची दिवाळी साजरी!!
- Dhaka Airport : ढाका आंतरराष्ट्रीय विमानतळावर आग, सर्व उड्डाणे थांबवली; कार्गो क्षेत्र जळून खाक, परिसरात विषारी वायू पसरण्याचा धोका