वृत्तसंस्था
पिंपरी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध तसेच विकेंड लॉकडाऊन लागू आहे. पण, अनेक नागरिक घराबाहेर पडून नियम तोडत आहेत. शनिवारी पिंपरीत विनामास्क फिरणाऱ्या ४४८ नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली. तसे नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही केले. Violation of Rules even in Pimpri Weekend Lockdown ! Action against 448 unmasked citizens
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना सुरु आहेत. त्यासाठी संचारबंदी लागू आहे. तरीही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरु आहे. तसेच काही नागरिक मास्कचा योग्य वापर करीत नाहीत. अशा नागिरकांवरही कारवाई होत आहे.
पोलिसांनी येथे केली कारवाई
एमआयडीसी भोसरी (३६), भोसरी (११), पिंपरी (०७), चिंचवड (१५), निगडी (०३), आळंदी (४१), चाकण (०६), दिघी (१४), सांगवी (१०), हिंजवडी (३४), देहूरोड (२८), चिखली (१३), रावेत चौकी (०५), शिरगाव चौकी (१८), म्हाळुंगे चौकी (०१) या ठाण्यांतर्गत पोलिसांनी ४४८ जणांवर कारवाई केली.
Violation of Rules even in Pimpri Weekend Lockdown ! Action against 448 unmasked citizens
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बदनामीचा कट, न्यूयॉर्क टाईम्सचे बनावट पान तयार करून सोशल मीडियावर केले व्हायरल
- खुनाच्या आरोपानंतर फरार ऑलिम्पिकपटू पहिलावन सुशील कुमार अटकेत
- चंद्रावर बर्फ आहे? शोधासाठी नासा चंद्रावर उतरवणार साडेसोळाशे कोटी रुपयांचा रोबोट
- पुणे जिल्हा ऍक्टिव्ह रुग्णांचा मोठा हॉटस्पॉट ; शुक्रवार अखेर ५८ हजार ८४० जण आढळले
- अंदमानात वर्षातील पहिला पाऊस बरसला ; मॉन्सून वारे दाखल ; केरळकडे वाटचाल सुरु