• Download App
    विनोद तावडे यांना भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी बढती; बावनकुळे यांच्यासारखे राजकीय पुनर्वसन Vinod Tawde elevated as BJP national general secretary

    विनोद तावडे यांना भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी बढती; बावनकुळे यांच्यासारखे राजकीय पुनर्वसन

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांना भाजपमध्ये बढती देऊन राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्त करण्यात आले आहे. कालच महाराष्ट्राचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन भाजपने त्यांचे राजकीय पुनर्वसन केले तसेच विनोद तावडे यांना राष्ट्रीय पातळीवर भाजपच्या राष्ट्रीय महामंत्री पदी अर्थात राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्त करून त्यांचेही एक प्रकारे राजकीय पुनर्वसन केले आहे.Vinod Tawde elevated as BJP national general secretary

    सध्या विनोद तावडे यांच्याकडे हरियाणा या राज्याची जबाबदारी आहे. विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे हे दोघेही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अनुक्रमिक शिक्षण मंत्री आणि ऊर्जामंत्री होते. राजकीय दृष्ट्या त्यांचे महत्त्व महाराष्ट्रात अधिक होते. परंतु 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची तिकिटे कापून त्यांना राजकीय धक्का दिला होता. मात्र त्यानंतर तावडे आणि बावनकुळे या नेत्यांनी पक्षाचे काम करणे सोडले नाही. विधानसभा निवडणूक काळात त्यांनी बंडखोरी न करता पक्षाचे केंद्रीय नेतृत्व सांगेल ते काम केले. आज या दोन्ही नेत्यांना पक्षाच्या नेतृत्वाच्या मर्जीप्रमाणे राजकीय पुनर्वसनाची संधी देण्यात आली आहे. पक्षनेतृत्व सांगेल ते काम करणाऱ्याला पुढची संधी हा राजकीय संदेश भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने यानिमित्ताने कार्यकर्त्यांना दिला आहे.


    पंकजा मुंडे, विनोद तावडेंच्या नाराजीवर राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेशाचा “डोस”


    चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे, तर विनोद तावडे यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदाची संधी देऊन पक्ष संघटनात्मक पातळीवर मोठी बढती देण्यात आली आहे. त्यामुळे आता विनोद तावडे यांचा यांची राजकीय भूमिका राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे ठरणार आहे या सरचिटणीस पदावरून ते कसे काम करतात यावर देखील त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

    त्याच वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अन्य नियुक्त्या देखील केल्या आहेत. त्यामध्ये शहजाद पूनावाला यांची राष्ट्रीय प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर भारती घोष यांना देखील राष्ट्रीय प्रवक्ता करण्यात आले आहे. बिहार मधील नेते ऋतुराज सिन्हा आणि झारखंड मधल्या नेत्या आशा लकडा यांना राष्ट्रीय मंत्री पदी नियुक्त करण्यात आले आहे.

    Vinod Tawde elevated as BJP national general secretary

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!