महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवाराना 10 टक्के इडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसंग्रामने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि उच्च न्यायालयाने दणका दिला तेव्हा राज्य सरकारने आरक्षणाचा आदेश काढला. सरकारला लाथा घातल्याशिवाय जाग येत नाही, असा हल्लाबोल शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे.Vinayak Mete’s attack, government does not wake up without kicking the
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवाराना 10 टक्के इडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसंग्रामने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली
आणि उच्च न्यायालयाने दणका दिला तेव्हा राज्य सरकारने आरक्षणाचा आदेश काढला. सरकारला लाथा घातल्याशिवाय जाग येत नाही, असा हल्लाबोल शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे.
मेटे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला लाथा घातल्याशिवाय जाग येत नाही. आता उशिरा का होईना पण राज्य सरकारने आदेश काढला, त्यांचे आभार. मात्र, याबरोबरच मराठा समाजाच्या इतर प्रश्ना संदर्भातही राज्य सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावेत.
अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला तयार व्हा. मराठा विद्यार्थी आणि उमेदवाराना 10 टक्के इडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात मिळणार 10 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
त्याबरोबर सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवार आरक्षणाचा 10 टक्के लाभ घेऊ शकतात. राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्दबातल ठरवल्यानंतर मराठा समाजातील
काही संघटनांकडून इडब्ल्यूएस आरक्षण मराठा समाजाला द्यावं अशी मागणी करण्यात येत होती. त्या मागणीचा सकारात्मक विचार करुन राज्य सरकारनं मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
Vinayak Mete’s attack, government does not wake up without kicking the
महत्त्वाच्या बातम्या
- संरक्षणक्षेत्रात आत्मनिर्भरतेचा गजर, १०८ प्रकारच्या लष्करी साहित्याच्या आयातीवर केंद्राची बंदी
- प्रधानमंत्री आवास योजनेतून गरीबांना निवारा आणि १ कोटी २० लाख लोकांना रोजगार
- हनी ट्रॅप स्कँडलप्रकरणी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची होणार चौकशी
- राजस्थानात कोरोना लसी चक्क कचऱ्यात फेकल्या, अडीच हजारांहून अधिक डोस वाया
- सॅल्यूट भारतीय सैनिकांना , ११०० अंश सेल्यियसच्या लाव्हाच्या लाटांपासून कांगोतील नागरिकांना वाचविले