• Download App
    एका आठवड्यासाठी सरपंच बनले बापू कांबळे! कोल्हापूर जिह्यातील माणगाव येथील 90 वर्षीय बापू कांबळेंचे स्वप्न झाले साकार | Village Sarpanch for one week! 90 year old Bapu Kamble fulfilled his dream

    एका आठवड्यासाठी सरपंच बनले बापू कांबळे! कोल्हापूर जिह्यातील माणगाव येथील 90 वर्षीय बापू कांबळेंचे स्वप्न झाले साकार

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : तुम्ही अनिल कपूरचा नायक सिनेमा पाहिला आहे का? एका दिवसासाठी तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो. रखडलेली बरीच कामे तो या एका दिवसात करतो आणि अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका मुख्यमंत्री बनतो. कोल्हापूर जिह्यातील माणगाव या गावामध्ये काहीशी अशीच एक घटना घडली आहे. बापू पिरा कांबळे या 90 वर्षीय गृहस्थांना या गुरूवारी एका आठवड्याचे सरपंच म्हणून पदभार दिला आहे.

    Village Sarpanch for one week! 90 year old Bapu Kamble fulfilled his dream

    त्याचं झालं असं की, आजवर त्यांनी ग्रामपंचायतीच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये निवडणुका लढवल्या होत्या. पण कोणतीही निवडणूक ते जिंकू शकले न्हवते. आता ते 90 वर्षांचे आहेत. आणि सरपंच व्हायची त्यांची इच्छा अपूर्ण राहिलेली होती. तर मुद्दा फक्त हा एकच न्हवता.


    Uddhav Thackeray and Devendra Fadanavis in Kolhapur : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा गावाबाहेर राहूनच नरसिंहवाडीच्या पूरग्रस्तांची संवाद; फडणवीस मात्र भर पाण्यात नरसिंहवाडीत


    माणगाव हे गाव एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहे. माणगाव या गावामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांना भेटले होते. आणि याच क्षणाची आठवण म्हणून तिथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देखील उभारण्यात आला होता. आणि हा पुतळा उभा करण्याच्या व्यवस्थापण टीम मधील एक मेम्बर आहेत बापू पिरा कांबळे. त्या टीममधील बापू कांबळे हे एकच मेंबर जिवंत आहेत. म्हणूनच त्यांच्या इच्छेचा मान राखून गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला होता.

    म्हणून गावातील काही लोकांनी मिळून जिल्हा परिषदेमध्ये त्यांना एका आठवड्यासाठी सरपंच बनवले जावे, असा विनंती अर्ज दिला होता. आणि या अर्जाला सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर त्यांना एक आठवड्याचा सरपंच म्हणून घोषित करण्यात आले आहे. या कार्यकाळामध्ये ते गावाच्या विकासाची बरीच कामे करु शकतात, लोकांना आदेशदेखील देऊ शकतात. पण फायनान्स रिलेटेड कोणताही निर्णय ते घेऊ शकत नाहीत. हा एकच नियम लागू करण्यात आला आहे. बापू कांबळे म्हणजे अण्णा मात्र ह्यामुळे प्रचंड खुश आहेत.

    Village Sarpanch for one week! 90 year old Bapu Kamble fulfilled his dream

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!