विशेष प्रतिनिधी
मुंबई : Radhakrishna Vikhe Patil मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. त्यानंतर देखील जरांगे पाटील आंदोलनावर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना म्हटले की हे फडणवीसांचे षड्यंत्र असून मी ते उधळून लावणार असल्याचा इशारा दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.Radhakrishna Vikhe Patil
महाविकास आघाडीच्या काळात हे आरक्षण गेले
माध्यमांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सरकारकडून शिंदे समितीला आणखी 6 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. तसेच जरांगे यांनी केलेल्या सगेसोयऱ्यांच्या मागणीवर आम्ही आज चर्चा केली आहे. सर्वांची भूमिका सकारात्मक आहे. मुख्यमंत्री यांनी देखील यापूर्वी विशेष पुढाकार घेऊन मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले होते. महाविकास आघाडीच्या काळात हे आरक्षण गेले. आता पुन्हा एकदा महायुती आल्यावर 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. आता कायदेशीर प्रक्रिया जी करायची आहे ती आम्ही करत आहोत.Radhakrishna Vikhe Patil
पुढे बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ही आमची पहिलीच बैठक होती, या बैठकीत आम्ही सगळ्या बाबींची चौकशी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. उपसमिती म्हणून आमची जी भूमिका घेतली आहे, जो आरक्षणाचा मुद्दा आहे, कुणबी प्रमाणपत्र द्यायचे आहे यावर देखील आमची चर्चा झाली आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणासाठी काय केले?
मनोज जरांगे पाटील यांनी काय आरोप करायचा काय नाही हा त्यांचा प्रश्न आहे. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचे काम फडणवीस यांनी मिळवून दिले होते. त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन हे केले होते. फडणवीस साहेब आडकाठी कुठेही करत नाहीत. त्यामुळे जरांगे यांनी आरोप करणे योग्य नाही. शरद पवारांना देखील आपण विचारले पाहिजे की ते जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी काय केले मराठा समाजासाठी? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांनी काय केले मराठा समाजाच्या आरक्षणासाठी? असा सवालही विखे पाटलांनी उपस्थित केला.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, कायद्याच्या प्रक्रियेत काही बाबी अडकल्या आहेत. मनोज जरांगे पाटलांना आमची विनंती आहे की सरकार विशेष पुढाकार घेत या सगळ्या गोष्टी पाहत आहे. तसेच गणेशोत्सव आहे, अशा वेळी आपण आंदोलन करू नये. तसेच आमच्या समितीला देखील त्यांनी काही काळ दिला पाहिजे, अशी विनंती राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे.
Shinde Committee Gets 6-Month Extension, Government Accepts Jarange’s Demand: Vikhe Patil
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार, उध्दव ठाकरेंनी मराठा समाजासाठी काय केले? राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल
- आर्थिक गैरव्यवहार, राष्ट्रीय सुरक्षेला धक्का, महुआ मोइत्रा यांच्या पतीवर गंभीर आरोप
- अथर्व सुदामेने फक्त एक व्हिडिओ डिलीट केला; तर सेक्युलर भारतावर हिंदुत्वाची ढगफुटी झाली!!
- Bangladesh : बांगलादेशने म्हटले- पाकिस्तानने 1971च्या नरसंहाराबद्दल माफी मागावी; पाकिस्तानी मंत्री म्हणाले- दोनदा मागितली