• Download App
    विखे-पाटलांचा महसूल मंत्री थोरातांवर हल्लाबोल, कोणत्या दूध संघाने किती पैसे लाटले याचा भांडाफोड हिवाळी अधिवेशनात करणार|Vikhe-Patil attacks revenue minister Thorat, will reveal how much money was laundered by which dairy

    विखे-पाटलांचा महसूल मंत्री थोरातांवर हल्लाबोल, कोणत्या दूध संघाने किती पैसे लाटले याचा भांडाफोड हिवाळी अधिवेशनात करणार

    नगर जिल्ह्यातील दिग्गज नेते असलेल्या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यातील कलगी तुरा चालूच आहे. नगरच्या एका मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय असे म्हणणाऱ्या विखे-पाटील यांनी कोणत्या दूध संघाने किती पैसे लाटले याचा भांडाफोड हिवाळी अधिवेशनात करणार असल्याचा इशारा दिला आहे.Vikhe-Patil attacks revenue minister Thorat, will reveal how much money was laundered by which dairy


    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर : नगर जिल्ह्यातील दिग्गज नेते असलेल्या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यातील कलगी तुरा चालूच आहे. नगरच्या एका मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय असे म्हणणाऱ्या विखे-पाटील यांनी कोणत्या दूध संघाने किती पैसे लाटले याचा भांडाफोड हिवाळी अधिवेशनात करणार असल्याचा इशारा दिला आहे.

    हा मंत्री कोण, असं पत्रकारांनी विचारलं असता जरा सबुरीने घ्या, लवकरच नाव उघड होईल, असे विखे पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, मागच्या सरकारने दुधाला प्रतिलीटर पाच रुपये अनुदान दिले. मात्र, शेतकऱ्यांना अनुदान न देता दूध संघाने ते पैसे हडप केले.



    कोणत्या दूध संधानं किती पैसे लाटले याचा भांडाफोड हिवाळी अधिवेशनात करणार आहे. संगरनेरमधील एका सहकारी दूध संघाने वर्षभर दुधाचे पैसे कापले. अन तेच पैसे रिबीट म्हणून देण्यात आले. शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांना दिले.

    अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका करताना विखे-पाटील म्हणाले, शाहरुख खानचा मुलगा गांजा पितो की काय करतो? समीर वानखेडे बिचारा काय करत होता. गेले 25 दिवस हे सुरु आहे. जसं की देशात आता दुसरे प्रश्नच शिल्लक नाहीत.

    नवाब मलिकांनी शोधलेली वनस्पती शेतकऱ्यांना पुरवा असं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. कृषी खात्याला आदेश द्या, या वर्षी वनस्पतीचं बी मिळाले पाहिजे. त्यातून लाखो रुपयांचे उत्पादन मिळेल.

    Vikhe-Patil attacks revenue minister Thorat, will reveal how much money was laundered by which dairy

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!